आरोग्यदायी समाजनिर्मितीसाठी स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 11:45 PM2018-09-15T23:45:55+5:302018-09-15T23:46:28+5:30
जोपर्यंत आपण स्वत: हातात झाडु घेऊन स्वच्छतेला सुरुवात करीत नाही तो पर्यंत स्वच्छतेच्या कामाला सुरवात होणार नाही. हे सुत्र मनाशी बाळगत सर्वांनी स्वच्छतेची सुरुवात स्वत: पासुन करावी.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जोपर्यंत आपण स्वत: हातात झाडु घेऊन स्वच्छतेला सुरुवात करीत नाही तो पर्यंत स्वच्छतेच्या कामाला सुरवात होणार नाही. हे सुत्र मनाशी बाळगत सर्वांनी स्वच्छतेची सुरुवात स्वत: पासुन करावी. असे झाल्यास स्वच्छता ही खऱ्या अर्थाने लोकचळवळ होईल. शिवाय आरोग्यदायी समाजाची निर्मिती होईल. आरोग्यदायी समाजनिर्मितीसाठी स्वच्छतेच्या या मोहिमेत प्रत्येक नागरिकाने सहभागी व्हावे, असे आवाहन जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी अजय गुल्हाणे यांनी केले.
जि.प.च्या स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) अंतर्गत १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात स्वच्छता ही सेवा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ सोहळा शनिवारी पार पडला. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पं.) विपुल जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पा.पु. व स्व.) शालिक मेश्राम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, कार्यकारी अभियंता (लघुसिंचन) एच. पी. गहलोत, शिक्षणाधिकारी (माध्य.) एस. आर. मेश्राम, समाज कल्याण अधिकारी अविनाश रामटेके, कार्यकारी अभियंता (बांध.) ए. पी. तेलंग, उपशिक्षणाधिकारी (प्राथ.) डॉ. वाल्मिक इंगोले आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
अजय गुल्हाणे पुढे म्हणाले, संपूर्ण गांधी जिल्हा हा स्वच्छ करण्याचा आमचा मानस आहे. त्यासाठी वर्धेकरांची आम्हाला साथ आवश्यक आहे. कुठलाही शासकीय उपक्रम लोकसहभागाशिवाय पूर्णत्त्वास जात नाही. शिवाय हे अभियान महत्त्वाकांशी असल्याने गावागावात नेमणूक केलेल्या संपर्क अधिकाºयांनी केवळ कागदोपत्री कार्यवाही न करता प्रत्येक्ष गावात जाऊन अभियानाबाबत दिलेल्या सुचना नुसार कार्यवाही करावी, असे स्पष्ट केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली. कार्यक्रमाच्या दुसºया सत्रात जिल्ह्यातील संवादकांची कार्यशाळा घेण्यात आली. याप्रसंगी पॉवर पॉर्इंट प्रेझेटेशन व्दारे उपस्थितांना माहिती देण्यात आली. याप्रसंगी महेश डोईजोड, कैलास बाळबुधे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी शालिक मेश्राम यांनी केले. संचालन विनोद खोब्रागडे यांनी केले. कार्यक्रमाला संपदा बोधनकर, अशोक रत्नपारखी, अंकुर पोहाणे, नरेंद्र येनोरकर, राहुल चावके, मनोज डेकाटे, नितिन कांबळे, गणेश सुरकार, किशोर तराळे आदींनी सहकार्य केले.