प्रवासी दोन तास ताटकळत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 10:15 PM2019-05-14T22:15:53+5:302019-05-14T22:16:14+5:30

प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रिद वाक्य इतरांपासून म्हणून घेणाऱ्या रापमचा भोंगळ कारभार प्रवाशांसाठी डोकेदुखीच ठरत आहे. आर्वी बस स्थानकावरून मंगळवारी दुपारी १ ते ३ या कालावधीत सुमारे दहा ते पंधरा गाड्या सोडण्यात आल्या.

Passengers travel for two hours | प्रवासी दोन तास ताटकळत

प्रवासी दोन तास ताटकळत

Next
ठळक मुद्देआर्वी आगारातील प्रकार : अधिकाऱ्यांकडून सौजन्याची ऐसीतैसी

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रिद वाक्य इतरांपासून म्हणून घेणाऱ्या रापमचा भोंगळ कारभार प्रवाशांसाठी डोकेदुखीच ठरत आहे. आर्वी बस स्थानकावरून मंगळवारी दुपारी १ ते ३ या कालावधीत सुमारे दहा ते पंधरा गाड्या सोडण्यात आल्या. परंतु, याच दरम्यान पुलगावच्या दिशेने जाणारी एकही गाडी न सोडल्याने तपत्या उन्हात अनेक प्रवाशांना ताटकळत रहावे लागले. चौकशी कक्षात विचारणा केल्यावर गाडी आल्यावर त्या दिशेने गाडी पाठविण्यात येईल, असे उत्तर देऊन वेळकाढू धोरणच अवलंबल्या गेले.
आर्वी बस स्थानकावरून आर्वी आगाराच्या बसेस पुलगाव व इतर गावांसाठी सोडल्या जातात. परंतु, या बसस्थानकावर बसची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांसाठी धड बसण्याचीही व्यवस्था नाही. विशेष म्हणजे उकाड्यामुळे जीवाची लाहीलाही होत असली तरी प्रवाशी ज्या ठिकाणी बसची प्रतीक्षा करतात तेथील पंखेच नादुरूस्त आहेत. उल्लेखनिय म्हणजे व्यवस्थापकच त्यांच्या कक्षात राहत नसल्याने प्रवाशांनी तक्रार करावी कुणाला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे आर्वी-पुलगाव मार्गावर अवैध प्रवासी वाहतूक होते. तब्बल दोन-दोन तास या मार्गावर बसेस सोडल्या जात नसल्याने रापमच्या अधिकाऱ्यांचे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांसोबत सोटेलोटे तर नाही ना असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. येथील मनमर्जी कारभाराकडे विभाग नियंत्रकांचे दुर्लक्ष होत आहे.

अन् संतप्त प्रवाशांनी मोडली अधिकाºयांच्या नावाने बोटे
लग्न सभारंभाला उपस्थिती दर्शविल्यानंतर परतीचा प्रवास करणारे प्रवासी दुपारी १ वाजता आर्वी बस स्थानक येथे पोहोचले. या प्रवाशांमध्ये खुबगाव, पिपरी, पारगोठाण, धनोडी, सावंगी, रोहणा सुमारे २०० नागरिक होते. तर रोहणा येथील स्व. कोल्हटकर कला महाविद्यालयात परीक्षा देण्यासाठी जाणारे काही विद्यार्थीही होते. दीड तासाचा भºयाचा कालावधी लोटला तरी पुलगावच्या दिशेने बस न लागल्याने संतप्त प्रवाशांनी चौकशी कक्ष गाठले. परंतु, तेथेही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने प्रवाशांनी आपला मोर्चा आगार व्यवस्थापकांच्या दालनाकडे वळविला. पण तेथे अधिकारीच नसल्याने प्रवाशांचा पारा आणखी चढला. त्यांंनी अधिकाºयांच्या नावाने बोटच मोडली. त्यानंतर काही काळीपिवळी गाडीने पुलगावच्या दिशेने निघाले. तर उर्वरित प्रवाशांनी रापमच्या अधिकाºयांनी ३.१५ वाजता लावलेल्या आर्वी-पुलगाव-यवतमाळ या रापमच्या गाडीने घर जवळ केले.

Web Title: Passengers travel for two hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.