बसचालकाच्या सतर्कतेने बचावले प्रवासी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 11:32 PM2017-09-01T23:32:26+5:302017-09-01T23:32:41+5:30
येथील हिंगणघाट मार्गावर वाघोली शिवारात बस आणि मालवाहूत जबर धडक झाली. या अपघाताच्यावेळी चालकाने दाखविलेल्या समयसूचकतेमुळे मोठा अपघात टळला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : येथील हिंगणघाट मार्गावर वाघोली शिवारात बस आणि मालवाहूत जबर धडक झाली. या अपघाताच्यावेळी चालकाने दाखविलेल्या समयसूचकतेमुळे मोठा अपघात टळला. यात मेटॅडोरचालक व वाहक गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडला.
सुरेश महादेव धकाते तसेच वाहक गणेश हरिभाऊ कन्नाके अशी जखमींची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर बसमधील नऊ प्रवासी किरकोळ जखमी झाले.
एमएच ४० वाय ५१६६ कमांकाची बस वर्धेवरून हिंगणघाटकडे निघाली. वाघोली नजीक बसवर मालवाहू वाहन थेट धडकले. या अपघाताच्यावेळी बस चालकाने बस रस्त्यालगतच्या शेतातील धुºयावर नेली. यामुुळे मोठा अपघात टळला. मालवाहुची धडक बसताच चालकाने वाहन पुढे नेले असते तर बसही उलटली असती. यात मोठा अपघात झाला आहे. या अपघातात मालाहूचा चालक गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. घटनेची नोंद पोलिसांनी घेतली असून तपास सुरू आहे.