ही वाट धुक्यात हरवली नाही.. धुराळ्यात गडप झाली आहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 10:49 AM2021-02-12T10:49:44+5:302021-02-12T10:50:10+5:30
Wardha News वर्धा जिल्ह्यातील सेलडोह-सिंदी-सेवाग्राम या ३५३ (आय) राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने वाहनांना मोठ्या धुरळ्यातून मार्ग काढावा लागतो आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: जिल्ह्यातील सेलडोह-सिंदी-सेवाग्राम या ३५३ (आय) राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने वाहनांना मोठ्या धुरळ्यातून मार्ग काढावा लागतो आहे. यात अपघाताच्या शक्यताही वाढल्या आहेत. गेल्या काही महिन्यापासून ठेकेदार बदलल्याने रस्त्याचे काम ठप्प पडले. मुरूम अंथरण्याच्या व्यतिरिक्त रोडचे काम समोर न सरकल्याने व वाहनाचे दळणवळण मोठ्या प्रमाणात सुरु असल्याने सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरते. चारचाकी गाडी गेली असता दुचाकी वाहनधारकास समोरचे येणारे वाहन दिसत नाही.त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण होत आहे. तसेच या उडणाऱ्या धुळीमुळे श्वसनाच्या आजारात वाढ झाली आहे.
या मार्गावर कायम उडत असलेल्या धुळीमुळे लगतच्या शेतातील कापूस हा खराब झाला आहे. काही शेतकऱ्यांच्या शेतातील चना, गहू इत्यादी पिकेसुध्दा खराब दिसत आहेत. या मार्गावर पाणी मारण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.