रुग्ण कल्याण समिती नावालाच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 11:20 PM2019-09-09T23:20:50+5:302019-09-09T23:21:12+5:30
आठ पदाधिकारी व अधिकाऱ्यांचा समावेश असलेली ही समिती व या समितीचे सदस्य रुग्णालयात फेरफटका मारत नसल्याचे बोलले जाते. रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागात असणारी रुग्णसंख्या पाहता या रुग्णांना चांगली सुविधा मिळावी म्हणून किती कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी हवेत, याकडे समितीचे दुर्लक्ष आहे. परिणामी, येथे येणाºया रुग्णांना गर्दीमुळे तपासणीसाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
घोराड : सेलू शहरात एकमेव असलेल्या ग्रामीण रुग्णालयात रुग्णांच्या कल्याणासाठी नेमण्यात आलेली समिती नावापुरतीच असल्याचे दिसून येत आहे.
आठ पदाधिकारी व अधिकाऱ्यांचा समावेश असलेली ही समिती व या समितीचे सदस्य रुग्णालयात फेरफटका मारत नसल्याचे बोलले जाते. रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागात असणारी रुग्णसंख्या पाहता या रुग्णांना चांगली सुविधा मिळावी म्हणून किती कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी हवेत, याकडे समितीचे दुर्लक्ष आहे. परिणामी, येथे येणाºया रुग्णांना गर्दीमुळे तपासणीसाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. तर नोंदणी विभागात दोन कर्मचारी लावले असतानाही गर्दीमुळे विलंब लागतो. नोंदणीसाठी रांगेत उभा राहणाºया रुग्णाला तपासणीसाठी रांगेत उभे राहावे लागत आहे. येथे
असलेल्या अपुºया कर्मचारी वर्गामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. याकडे लक्ष देऊन रुग्ण कल्याण समितीने हेका धरण्याची गरज आहे; पण तसे होत नाही. आठ सदस्यीय रुग्णकल्याण समितीत एक लोकप्रतिनिधी आहे तर इतर सात सदस्य शासकीय अधिकारी आहेत. यापैकी तीन अधिकाºयांची बदली झाली असताना त्यांची नावे मात्र या फलकावर कायम आहेत. या समितीतील वैद्यकीय अधीक्षक कीर्ती पाटील, वैद्यकीय अधिकारी शकील शेख, तालुका वैद्यकीय अधिकारी पी. पी. धमाने यांची वर्षभरापूर्वी बदली झाली असताना नावे फलकावर कायम असल्याने ही रुग्ण कल्याण समिती खरेच रुग्णांना सोयी सुविधा मिळते की नाही याकडे लक्ष देत असेल का, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
तालुक्यातील रुग्णांना चांगली सेवा मिळावी म्हणून असलेल्या ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना चांगली सेवा मिळावी व रुग्णांची हेळसांड होऊ नये यासाठी आता लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.