पवनारसह वरूडचा होणार कायापालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 11:46 PM2018-08-25T23:46:04+5:302018-08-25T23:46:19+5:30

सेवाग्राम व पवनार या दोन ऐतिहासिक गावांना जोडणाऱ्या वरूड आणि पवनार या दोन गावाचा कायापालट होणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेवाग्राम विकास आराखड्या अंतर्गत १७ कोटींचा निधी देण्याच्या विषयाला शिखर समितीच्या बैठकीत अंतीम मंजुरी दिली असल्याची माहिती आ. डॉ. पंकज भोयर यांनी दिली आहे.

Pawanara will be replaced with a verdant | पवनारसह वरूडचा होणार कायापालट

पवनारसह वरूडचा होणार कायापालट

Next
ठळक मुद्देपंकज भोयर : १७ कोटींचा निधी मंजूर, विविध विकास कामे मार्गी लागणार

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सेवाग्राम व पवनार या दोन ऐतिहासिक गावांना जोडणाऱ्या वरूड आणि पवनार या दोन गावाचा कायापालट होणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेवाग्राम विकास आराखड्या अंतर्गत १७ कोटींचा निधी देण्याच्या विषयाला शिखर समितीच्या बैठकीत अंतीम मंजुरी दिली असल्याची माहिती आ. डॉ. पंकज भोयर यांनी दिली आहे. त्यासाठी आपण पाठपुरावा केल्याचेही आ. भोयर यांचे म्हणणे आहे.
वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना १ जाने २०१७ ला पत्र देवून पवनार व वरूड गावाच्या अंतर्गत पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी दोन्ही गावांसाठी प्रत्येकी १० कोटी रूपयांचा निधी देण्याची मागणी आ. भोयर यांनी केली होती. त्यावर वित्तमंत्री मुनगंटीवार यांनी त्वरित अप्पर मुख्य सचिव (नियोजन) यांना निधी उपलब्ध करण्याचे निर्देश दिले. त्या अनुषंगाने १६ जानेवारी २०१७ ला नियोजन विभागाचे अप्पर सचिव य. अ. पिंपळे यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून या संबंधी आराखडा पाठविण्याचे निर्देश दिले. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी २४ मार्च २०१७ व २० जून २०१७ ला सविस्तर आराखडा नियोजन विभागाकडे पाठविला. ४ सप्टेंबर २०१७ ला उच्चाधिकारी समितीच्या बैठक पार पडली. या बैठकीत सदर दोन्ही गावातील पायाभूत कामांसाठी १९.८८ कोटी रूपयांच्या कामांचे सादरीकरण करण्यात आले. समितीने हा आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणाºया शिखर समिती समोर अंतीम मान्यतेसाठी ठेवला. २४ आॅगस्टला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसी यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे पार पडलेल्या शिखर समितीच्या बैठकीत हा विषय चर्चीला गेला. त्यावेळी खा. रामदास तडस, आ. पंकज भोयर, मुख्यमंत्री कार्यालयाचे अप्पर मुख सचिव प्रवीण परदेशी, अप्पर मुख्य सचिव (वित्त विभाग), प्रधान सचिव, जलसंदपदा विभाग, पोलीस महासंचालक महाराष्ट्र विभागीय आयुक्त नागपूर व जिल्हाधिकारी शैलेश नवाल उपस्थित होते. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत निधी देण्याच्या विषयाला मंजुरी दिली.
ही कामे होणार
राज्य शासनाकडून प्राप्त होणाºया निधीतून वरूड येथे १० कोटी रूपयांची तर पवनार येथे ७ कोटी रूपयांची विकास कामे होणार आहेत. सदर निधीतून या दोन्ही गावात अंतर्गत रस्ते, जलनिस्सारण सांडपाणी, जलशुद्धीकरण, सौरऊर्जा संच, ग्रंथालय, सार्वजनिक जागांचे सौंदर्यीकरण, नाला व नाली बांधकाम, हायमास्ट बसविणे आदी कामे केली जाणार आहे.
ग्रामस्थांनी केली आमदारांशी चर्चा
प्रथमच मोठ्या प्रमाणात गावांसाठी निधी मिळाल्याचे माहिती होताच पवनारचे सरपंच अजय गांडोळे, वरूडचे सरपंच वासुदेव देवडे, पं. स. सभापती महानंदा ताकसांडे, सेवाग्राम विकास आराखडा सनियंत्रण समिती सदस्य निलेश किटे, जि. प. च्या माजी सदस्य सुनीता ढवळे, ग्रा.पं. सदस्य सुनील फरताडे, प्रमोद राऊत, अरूणसिंग, निमरोट, अशोक भट, बाळशीराम मानोले, शंकर वाघमारे, नंदा उमाटे, अर्चना डगवार, वर्षा बांगडे, जयश्री मेहर, पुष्पा बोकडे, ज्योत्सना गवळी, शुभांगी हिवरे, अरूणा काकडे, लखन, आशीष ताकसांडे आदींनी आ. डॉ. पंकज भोयर यांचे निवासस्थान गाठून विविध विषयांवर चर्चा केली.
पवनारच्या धाम नदीपात्राचा होतोय विकास
सेवाग्राम विकास आराखड्या अंतर्गत या आधी पवनार येथील धाम नदीच्या घाटाच्या बांधकामासाठी तसेच सौंदर्यीकरणाकरिता २१ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. सदर काम युद्धपातळीवर पूर्ण केले जात असून यामुळे पवनारच्या धाम नदी पात्राचा कायापालट होणार आहे.

प्रयत्नांना यश
वरुड व पवनार या दोन्ही गावांचा विकास व्हावा, या हेतूने तसेच सदर दोन्ही गावातील विविध कामांसाठी शासकीय निधी खेचून आणण्यासाठी आ. डॉ. पंकज भोयर यांनी संबंधितांकडे पाठपुरावा केला. दोन्ही गावांना मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाल्याने आमदारांच्या प्रयत्नांना यश आले आहे. शिवाय विकास कामांमुळे गावांचा कायापालट होणार असल्याने तेथील रहिवाशांना दिलासा मिळणार आहे.
पवनार व वरुड या गावात विविध विकास कामे करण्यासाठी निधी मिळावा म्हणून आ. डॉ. पंकज भोयर यांनी पालमंत्री ते मुख्यमंत्रीपर्यंत वेळोवेळी पाठपुरावा केला.

Web Title: Pawanara will be replaced with a verdant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.