हजार रुपये द्या, अन् बिनधास्त परवानाधारक सावकार व्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 18:24 IST2025-03-17T18:23:40+5:302025-03-17T18:24:59+5:30

Wardha : तक्रार होताच सावकारांवर होते कारवाई

Pay a thousand rupees and become a licensed moneylender without any hassle. | हजार रुपये द्या, अन् बिनधास्त परवानाधारक सावकार व्हा

Pay a thousand rupees and become a licensed moneylender without any hassle.

लोकमत न्यूज नेटवर्क 
वर्धा :
हजार रुपयात कागदपत्रांची जुळवाजुळव करून सावकारी परवाना मिळतो. यामुळे परवानाधारक सावकारांचे प्रमाण जिल्ह्यात वाढले आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यात परवानाधारक सावकारांच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. पूर्वीच्या तुलनेत सावकार वाढले.


अर्जासाठी ५०० रुपयांचा स्टॅम्प
विहित नमुन्यात ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर अर्जदाराला अर्ज सादर करता येणार आहे. सावकारीसाठी ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र, ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर जबाबदार व्यक्तीचे प्रतिज्ञापत्र घ्यावे लागेल.


या कागदपत्राने मिळतो सावकारी परवाना
विहित नमुन्यात कोर्ट फी स्टॅम्प, सावकारी परवाना फी भरल्याची चलानप्रत, ५०० रुपयांच्या स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र, चालू वर्षातील भांडवल गुंतवणुकीचे बँकेचे पासबुक, आयकर, विक्रीकर भरल्याचे चलानपत्र.


परवान्याआड इतरही व्यवहार
परवानाधारक सावकार अधिकृत सावकारी आणि काही व्यक्ती अनधिकृतपणेही सावकारी वितरित करतात. यासाठी मोठ्या व्यक्तींकडून पैसे घेऊन त्याला पाच रुपये, दहा रुपये शेकडा अशा पद्धतीने कर्ज दिले जाते.


अनधिकृत सावकार वाढले
बँकांकडून मिळणारे कर्ज तोकडे आहे. यामुळे अनेक शेतकरी अथवा इतर व्यक्ती आर्थिक अडचण भागविण्यासाठी अवैध सावकाराकडून कर्ज घेतात. यात कमी वेळात पैसा वाढतो. त्यामुळे अनेकांनी हा व्यवसाय सुरू केला आहे.


तक्रार होताच सावकारांवर होते कारवाई, तक्रारी मात्र नाही
तक्रार दाखल होताच अवैध सावकारीसंदर्भात कारवाई केली जाते. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून तालुका स्तरावर तशा सूचना दिल्या असल्याचे सांगण्यात आले आहे.

Web Title: Pay a thousand rupees and become a licensed moneylender without any hassle.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :wardha-acवर्धा