सिंचन विहिरीचे देयक अडकले; शेतकरी त्रस्त
By admin | Published: April 20, 2015 01:49 AM2015-04-20T01:49:41+5:302015-04-20T01:49:41+5:30
स्थानिक ग्रा़पं़ चे नगर पंचायतमध्ये रूपांतर झाल्याने सुरू असलेल्या सिंचन विहिरीचे देयक अडकले़ ....
सेलू : स्थानिक ग्रा़पं़ चे नगर पंचायतमध्ये रूपांतर झाल्याने सुरू असलेल्या सिंचन विहिरीचे देयक अडकले़ यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत़ शासकीय कार्यालयातून योग्य उत्तर मिळत शेतकरी त्रस्त आहे़ संबंधित यंत्रणेने याकडे लक्ष देत अनुदान मिळवून देणे गरजेचे झाले आहे़
मनरेगा अंतर्गत सेलू येथील तीन शेतकऱ्यांना सिंचन विहीर मंजूर झाली़ २ फेब्रुवारीच्या पत्रानुसार विहिरीच्या खोदकामास सुरूवात केली. तत्कालीन ग्रामविकास अधिकाऱ्यांनी विहिरीचे खोदकाम करण्यास सांगितले; पण अवघ्या काही दिवसांनी सेलू ग्रा़पं़ ही नगर पंचायत बनली आणि प्रशासक म्हणून तहसीलदारांच्या हाती कार्यभार आला. ग्रामसचिवाचे पद रिक्त झाले आणि विहिरीच्या मजुराचे मस्टर अडकले़ यानंतर विनोद गोमासे, सुरेश कुकडे, कुंदा चोरे या शेतकऱ्यांनी खोदलेल्या विहिरीचे देयके मिळावे म्हणून ग्रा़पं़ व पं़स़मध्ये चौकशी केली़ यावर गटविकास अधिकाऱ्यांनी तहसीलदारांकडे जाण्यास सांगितले़
ग्रा़पं़ चा कारभार संपूष्टात येऊन नगर पंचायतचा कारभार सुरू झाल्याने शेतकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे़ नगर पंचायतमध्ये प्रशासकाची नियुक्ती झाली; पण मुख्याधिकारी नाही़ यामुळे अनेकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांचे मस्टर काढून त्यांना सहकार्य करावे, अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र दंढारे, विनोद गोमासे यांनी तहसीलदारांना निवेदनातून केली़(शहर प्रतिनिधी)