हातगाडीधारक नियोजित स्थळी न गेल्यास दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 10:42 PM2018-02-11T22:42:52+5:302018-02-11T22:43:06+5:30

शहरातील रस्ते मोकळे व्हावे या हेतूने स्थानिक पालिकेच्यावतीने अतिक्रमण हटाव मोहीम होती घेण्यात आली आहे.

 Penal action if handcuffs are not planned | हातगाडीधारक नियोजित स्थळी न गेल्यास दंडात्मक कारवाई

हातगाडीधारक नियोजित स्थळी न गेल्यास दंडात्मक कारवाई

googlenewsNext
ठळक मुद्देमुख्याधिकाऱ्यांच्या सूचना : सुटीच्या दिवशी अतिक्रमण हटाव मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरातील रस्ते मोकळे व्हावे या हेतूने स्थानिक पालिकेच्यावतीने अतिक्रमण हटाव मोहीम होती घेण्यात आली आहे. सुट्टीचा दिवस असलेल्या रविवारी न.प.चा गजराज बजाज चौक ते शास्त्री चौक या मार्गावरील अतिक्रमणावर चालला. बजाज चौकात नेहमीच होणाºया वाहतूक कोंडीचे खापर न.प.च्या माथी फोडल्या जात असल्याने मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांनी हातगाड्यांवर फळविक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांना काही मार्गदर्शक सुचना करीत त्याचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाईला सोमोरे जावे लागेल, असे सांगितले.
स्थानिक शिवाजी चौक ते बजाज चौक भागातील अतिक्रमण शनिवारी काढल्यानंतर रविवारी न. प. च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपला मोर्चा बजाज चौक ते शास्त्री चौक या मार्गाकडे वळविला. रविवारी जेसीबीच्या सहाय्याने पालिका कर्मचाऱ्यांनी सदर रेल्वे स्थानक मार्गावरील ठिकठिकाणचे अतिक्रमण काढले. बजाज चौकात हातगाडीवाले रस्त्याच्या मधोमधच हातगाडी उभी करून फळ विक्रीचा व्यवसाय करतात. या परिसरात दररोज दोन वाहतुक शिपायांची नियुक्ती केली जात असली तरी वाहतूक नियंत्रण शाखेचे वरिष्ठ अधिकारी आल्यावर किंवा त्यांचे चारचाकी वाहन आल्यावरच बजाज चौक परिसरात रस्त्याच्या मधोमध हातगाडी उभी करून फळविक्री करणारे आपली हातगाडी इतर ठिकाणी हलवितात. न. प. मुख्याधिकारी वाघमळे यांनी रविवारी मोहिमेदरम्यान स्वत: हातगाडीधारकांना न.प.ने निश्चित करून दिलेल्या शास्त्री चौकातील जागेवर बंडी लावावी. शिवाय हातगाड्या लोकांना त्रास व वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा लावल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल आदी सूचना केल्या.
कचरा न.प.च्या कचरापेटीत टाका
स्वच्छ सर्वेक्षण २०१८ च्या अनुषंगाने स्थानिक न.प.प्रशासनाच्यावतीने वर्धा शहरात स्वच्छतेबाबतचा जागर केल्या जात आहे. हातगाडीवर फळ व इतर साहित्य विक्री करणाऱ्यांनी कुठल्याही परिस्थितीत कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळावा. शिवाय त्यांनी त्यांच्याकडे गोळा होणारा कचरा रस्त्याच्याकडेला न टाकता ठिकठिकाणी न.प.ने लावलेल्या कचरापेटीत टाळावा, अशा सुचनाही याप्रसंगी न.प. मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांच्यासह न.प. अधिकारी व कर्मचाºयांनी केल्या. कमी जाडीच्या प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर कुठल्याही व्यावसायिकांनी केल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही यावेळी छोट्या व्यावसायिकांना सांगण्यात आले.

Web Title:  Penal action if handcuffs are not planned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.