प्रलंबित मागण्यांसाठी बोरगावच्या नागरिकांचे धरणे
By admin | Published: April 14, 2017 02:21 AM2017-04-14T02:21:26+5:302017-04-14T02:21:26+5:30
बोरगाव (मेघे) येथील वॉर्ड क्रमांक एकमधील नागरिकांनी विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी बुधवारी जिल्हाधिकारी
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : स्थायी पट्टे व घर टॅक्स पावती देण्याची मागणी
वर्धा : बोरगाव (मेघे) येथील वॉर्ड क्रमांक एकमधील नागरिकांनी विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी स्थायी पट्टे देण्यात यावे यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
वॉर्ड क्रमांक एकमधील रहिवासी नागरिकांना स्थायी घरकुलाचे पट्टे द्या, झोपडपट्टीधारकांना घरटॅक्स पावती देण्यात यावी, झोपडपट्टीधारकांना शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून रस्ते, नाल्या, पाणी, विद्युत, पथदिवे आदींसह संपूर्ण प्राथमिक सुविधा देण्यात याव्या, स्वस्त धान्य दुकानातून धान्य उपलब्ध करून देण्यात यावे आदी मागण्या लावून धरण्यात आल्या. वॉर्ड १ मध्ये पाण्याची समस्या आहे. उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवत असल्याने महिलांना भटकंती करावी लागते. याबाबत अनेकदा प्रशासनास तक्रारी करण्यात आल्या; पण कुणीही लक्ष दिले नाही. लोकप्रतिनिधींही याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांनी निवेदनात नमूद केले आहे. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करीत निवेदन देण्यात आले. आंदोलनात माजी उपसरपंच विनोद चौधरी, माजी जि.प. सदस्य प्रभाकर बोटकुले, माजी सरपंच बाबाराव पाटील, माजी पं.स. सभापती मनोज चौधरी, प्रेमशंकर गुप्ता, राजू सातपुते, हरिश्चंद्र मिटकर तथा महिला, पुरूष सहभागी झाले.(कार्यालय प्रतिनिधी)