कामे प्रलंबितच, देयके मात्र ‘क्लियर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 01:02 AM2017-11-23T01:02:45+5:302017-11-23T01:03:34+5:30

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना सिंचनाची सुविधा मिळावी म्हणून केंद्र व राज्य शासनाने पॅकेजच्या विहिरी दिल्या. वीज पुरवठ्याची सोय करून दिली; पण ही मोहीम राबविणारी यंत्रणाच भ्रष्ट असल्याने योजनेवर प्रश्नचिन्ह लागले.

Pending works, payments are only 'clear' | कामे प्रलंबितच, देयके मात्र ‘क्लियर’

कामे प्रलंबितच, देयके मात्र ‘क्लियर’

Next
ठळक मुद्देकृषीपंपाच्या वीज जोडणीतील प्रकार : जिल्ह्यातील ३ हजार ४०० शेतकरी प्रतीक्षेत

प्रशांत हेलोंडे।
ऑनलाईन लोकमत 
वर्धा : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना सिंचनाची सुविधा मिळावी म्हणून केंद्र व राज्य शासनाने पॅकेजच्या विहिरी दिल्या. वीज पुरवठ्याची सोय करून दिली; पण ही मोहीम राबविणारी यंत्रणाच भ्रष्ट असल्याने योजनेवर प्रश्नचिन्ह लागले. जिल्ह्यातील ३४०० शेतकरी आजही वीज जोडणीची प्रतीक्षा करीत आहे; पण यातील कंत्राटदारांची देयके मात्र कामे होण्यापूर्वीच ‘क्लियर’ केलीत.
वीज जोडणी न मिळाल्याने शेतकरी कार्यालयात चकरा मारून थकले; पण वास्तव काही औरच आहे. वीज पुरवठ्याची जोडणी होण्यापूर्वीच लाखो रुपयांची देयके अदा केलीत. या प्रकरणी राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे जिल्ह्यातील शेतकºयांनी तक्रारी केल्या आहेत.
महावितरण अधीक्षक अभियंता वर्धा कार्यालयांतर्गत कार्यकारी अभियंता वर्धा, हिंगणघाट, आर्वी असे तीन विभाग आहे. या विभागांनाही अधीक्षक अभियंत्यांनी स्वत:च्या मर्जीतील एजेंसी नेमून त्यांना कामे दिली आहे. ही कामे कुठे सुरू झाली तर काही ठिकाणी सुरूवातही झाली नाही; पण अ‍ॅडव्हान्स देयके अदा करण्यात आली आहेत. शेतकºयांच्या हक्काची ही योजना भ्रष्टाचाराच्या मार्गात अडकल्याने जिल्ह्यातील ३४०० शेतकरी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. वारंवार मागणी करूनही सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे.
सध्या रबी हंमाग सुरू झाला आहे. विहिरीवरून शेतातील सिंचनाची व्यवस्था करण्यासाठी वीज जोडणी गरजेची आहे. त्यांना त्वरित जोडणी देण्याची गरज आहे. मागील वर्षी मोठ्या प्रमाणात वीज जोडणीची कामे करण्यात आलीत; पण २०१७-१८ या वर्षात कुठेही वीज जोडणीची कामे झाली नाहीत. याबाबत वीज वितरण कंपनीला विचारणा केली असता एप्रिल २०१८ पासून आजपर्यंत निधीच आला नाही. मागील वर्षीच्या निधीतूनच कामे केली जात आहेत. यामुळे गतवर्षी काढलेली अ‍ॅडव्हान्स बिले आतापर्यंत पुरली काय, कामे झाली तर त्याचे आॅडीट गेले कुठे, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रश्नांची उत्तरे अधिकाºयांकडेही नसल्याने ते टाळाटाळ करीत असल्याचे दिसून आले. वीज जोडणी देण्यापूर्वीच कंत्राटदारांची देयके अदा करण्यात आली आहेत. यामुळे महावितरणच्या कार्यावरच संशय निर्माण होत असून चौकशी गरजेची आहे.
शासनाची दिशाभूल
कृषीपंप जोडणीच्या कामासाठी शासनाने मागील वर्षी निधी उपलब्ध करून दिला होता. या निधीतून अधिकाºयांनी अ‍ॅडव्हॉन्स काढून ठेवला आहे. काहींची बिले दिलीत. आता नेमलेल्या एजेंसी काम करण्यास टाळाटाळ करीत आहे. शेतकरी मात्र न्यायासाठी भटकंती करीत आहे. मागील वर्षीचा निधी पूर्ण खर्च झाला, असे दाखवून शासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
अभियंत्याचा प्रताप
कृषीपंप जोडणीच्या कामांची देयके आर्वी येथील उपकार्यकारी अभियंता देशमुख यांनी मर्जीतील कंत्राटदारांना अ‍ॅडव्हान्समध्ये अदा केली. देशमुख यांनी जोडणीपूर्वीच देयके अदा केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या प्रकरणाची चौकशी करून योग्य कार्यवाही करणे तथा उर्वरित वीज जोडण्या त्वरित देण्याची गरज निर्माण झाली आहे.

कृषी पंप जोडणीच्या कामासाठी मागील वर्षी प्राप्त झालेला निधी खर्च करणे सुरू आहे. यावर्षी कुठलाही निधी आलेला नाही. ‘अ‍ॅडव्हान्स’ देयके देणाºया अधिकाºयांवर कारवाई करण्यात येईल.
- सुनील देशपांडे, अधीक्षक अभियंता, वीज वितरण कंपनी, वर्धा.

Web Title: Pending works, payments are only 'clear'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.