जन औषधीपेक्षा जन कृषिसेवा केंद्र आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 11:57 PM2018-01-29T23:57:46+5:302018-01-29T23:58:04+5:30

पूर्वी उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी हा व्यवहारक्रम होता; पण आज शेती हा कायम तोट्याचा व्यवसाय झाला आहे.

People's agricultural services center than public medicines | जन औषधीपेक्षा जन कृषिसेवा केंद्र आवश्यक

जन औषधीपेक्षा जन कृषिसेवा केंद्र आवश्यक

Next
ठळक मुद्देशैलेश अग्रवाल : पवनार येथे शेतकरी मेळावा

आॅनलाईन लोकमत
पवनार : पूर्वी उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी हा व्यवहारक्रम होता; पण आज शेती हा कायम तोट्याचा व्यवसाय झाला आहे. हा व्यवहारक्रम उलटून उत्तम नोकरी, मध्यम व्यापार व कनिष्ठ शेती झाला. रुग्णांसाठी स्वस्त औषधी केंद्रापेक्षाही गरजेचे स्वस्त दरात सेंद्रिय औषधी व विना जणुकांतरीत बियाणे मिळणारे जन कृषिसेवा केंद्र उभारून शेतकºयांना कृषि सेवा केंद्रांमार्फत होणाºया मोठ्या खर्चातून वाचविणे गरजेचे आहे, असे मत शेतकरी आरक्षणचे शैलेश अग्रवाल यांनी व्यक्त केले.
पवनार येथे शेतकरी मेळावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी शिवसेनेचे संपर्कप्रमुख माजी खासदार अनंत गुढे, उपजिल्हाप्रमुख राजेश सराफ, प्रा.डॉ. नारायण निकम व अन्य सेना पदाधिकारी उपस्थित होते. अग्रवाल पूढे म्हणाले की, जन कृषिसेवा केंद्रांतून शेतीतील रसायन हद्दपार करून स्वास्थ्यहानीला आळा घालणे शक्य आहे. शेती व दुग्ध व्यवसायात थेट उत्पादक ते ग्राहक हीच व्यवहार पद्धती टिकवून ठेवण्याची गरज होती. त्यात शेतकºयांना त्यांच्या मालाचे भाव ठरविण्याचा अधिकार अबाधित ठेवून स्वबळावर प्रगती करता आली असती. कृषी उत्पन्न बाजार व्यवस्थेद्वारे शासनाने व्यापाºयांच्या माध्यमातून नियंत्रण ठेवून शेतकºयांचा तोटा वाढविला आहे. यावर मलमपट्टी म्हणून हमीभावाचे धोरण आखण्यात आले. हमीभावाची उपयोगीता व अमलबजावणी सर्वश्रूत आहे. यामुळे कधी गर्भश्रीमंत शेतकरी आज हवालदिल झाला, असे सांगितले. याप्रसंगी उपस्थितांनी मार्गदर्शन केले. मेळाव्याला शेतकरी उपस्थित होते.

Web Title: People's agricultural services center than public medicines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.