प्रजासत्ताकदिनी आत्मदहनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 10:34 PM2019-01-24T22:34:49+5:302019-01-24T22:35:09+5:30

नजिकच्या पळसगांव (बाई) येथील शेतकरी राजू विश्वनाथ भट यांना कोणताही मोबदला न देता विद्युत टॉवर लाईनसाठी सागाची ६१ झाडे तोडण्यात आली. झाडे कापण्यास विरोध केल्यावरही न जुमानता पॉवर ग्रीडचे अधिकारी व नायब तहसिलदार यांच्या संगणमताने झाडे तोडत शेतकरी राजू भट याला आत्महत्येस प्रवृत्त केले.

People's Republican autobiography | प्रजासत्ताकदिनी आत्मदहनाचा इशारा

प्रजासत्ताकदिनी आत्मदहनाचा इशारा

Next
ठळक मुद्देमोबदला न दिल्याने उचलले पाऊल

लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदी (रेल्वे) : नजिकच्या पळसगांव (बाई) येथील शेतकरी राजू विश्वनाथ भट यांना कोणताही मोबदला न देता विद्युत टॉवर लाईनसाठी सागाची ६१ झाडे तोडण्यात आली. झाडे कापण्यास विरोध केल्यावरही न जुमानता पॉवर ग्रीडचे अधिकारी व नायब तहसिलदार यांच्या संगणमताने झाडे तोडत शेतकरी राजू भट याला आत्महत्येस प्रवृत्त केले. त्यामुळे दोषींविरु द्ध गुन्हा दाखल करण्याची तक्रार शेतकऱ्याच्या आईने पोलिसात केली होती. पण, गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याने पिडीत शेतकºयाने प्रजासत्ताकदिनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
राजू विश्वनाथ भट यांच्या शेत सर्वे नं. ६१५ व ६२४ या शेतातून पॉवर ग्रीड कार्पोरेशन आॅफ इंडिया लिमिटेडची विद्युत टॉवर लाईन गेली आहे. या तारांखाली ५० ते ६० वर्षे जुनी वडिलोपार्जीत सागाचे ६१ झाडे होती. कंपनीने या झाडांचा कुठलाही मोबदला न देता नायब तहसिलदार बाबाराव तिनघसे व पॉवर ग्रीडच्या कर्मचाऱ्यांनी दबाव टाकत ५ डिसेंबरला सकाळी साडेअकरा वाजता झाडांची कत्तल केली. यावेळी शेतात शेतकरी राजू व त्याची आई लिला भट उपस्थित असल्याने या दोघांनीही झाडे कापण्याला विरोध करुन कायदेशीर प्रक्रिया करण्याकरिता १० ते १२ दिवसांचा कालावधी मागितला होता. परंतू कालावधी ने देता झाडे कापण्याचा सपाटा सुरुच ठेवला. त्यामुळे संतप्त शेतकऱ्याने कीटकनाशक प्राशन केले. राजूला अधिकाऱ्यांनीच आत्महत्येस प्रवृत्त केल्याने लिला भट यांनी सिंदी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. तसेच गावकऱ्यांच्यावतीने सिंदीचे ठाणेदार व पोलीस अधीक्षकांना निवेदनही दिले होते. सोबतच शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्याकरिता विविध राजकीय व सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन विशेष पोलीस महानिरिक्षक यांनाही निवेदन दिले. पण अजुनही गुन्हा दाखल केला नाही.

Web Title: People's Republican autobiography

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.