कुंचल्यातून घेतला सामाजिक समस्यांचा वेध

By admin | Published: January 17, 2016 01:58 AM2016-01-17T01:58:18+5:302016-01-17T01:58:18+5:30

सत्यनारायण बजाज सार्वजनिक जिल्हा ग्रंथालय येथे आंतरशालेय चित्रकला, निबंध व वादविवाद स्पर्धा घेण्यात आली.

Perception of social problems taken from Panchalya | कुंचल्यातून घेतला सामाजिक समस्यांचा वेध

कुंचल्यातून घेतला सामाजिक समस्यांचा वेध

Next

जिल्हास्तरीय आंतरशालेय निबंध व चित्रकला स्पर्धेत चिमुकल्यांचा अविष्कार
वर्धा : सत्यनारायण बजाज सार्वजनिक जिल्हा ग्रंथालय येथे आंतरशालेय चित्रकला, निबंध व वादविवाद स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत बालकांनी रेखाटलेल्या चित्रातून सामाजिक समस्यांचा वेध घेतला. शब्दांपेक्षाही प्रभावीरीत्या भाष्य करणारी ही चित्र अत्यंत बोलकी ठरली. शुक्रवारी स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. दा.ना. आसमवार होते. ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रदीपकुमार बजाज, सचिव गौरीशंकर टिबडेवाल, आजीवन सदस्य शशिकला बजाज उपस्थितीत होत्या. या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
निंबध व चित्रकला स्पर्धा दोन गटांमध्ये घेण्यात आली. निबंध स्पर्धेत ‘अ’ गटात प्रथम स्थान आस्था बकाने, द्वितीय सलोनी विश्वकर्मा, तृतीय सेजल मंडवे, साक्षी कडू, कौस्मीन गोटे हे पुरस्काराचे मानकरी ठरले. ‘ब’ गटात प्रथम पुरस्कार गुड्डी धाबर्डे, द्वितीय भावेश पेटकर, तृतीय उदित खोरिया, पायल देवतळे, कोमल रोहनकर यांनी पटकाविला.
चित्रकला स्पर्धेत ‘अ’ गटात प्रथम पुरस्कार धनश्री मेहर, द्वितीय अदिती ठाकूर, तृतीय कनिका गुलेरिया तर तनुश्री पळसकर, साक्षी पाटील तसेच चित्रकला स्पर्धा ‘ब’ गटात प्रथम पुरस्कार धिरज जाधव, द्वितीय वैष्णवी म्हस्के, तृतीय पुरस्कार स्वराज काकडे, प्रज्वल गोडघाटे, साक्षी अग्रवाल यांना पारितोषिक देण्यात आले.
वादविवाद स्पर्धा सत्यनारायण बजाज स्मृतिप्रित्यर्थ घेण्यात आली. यात साक्षी पिंजरकर प्रथम आली तर द्वितीय उदित खोरिया, तृतीय वैष्णवी भेंडे ठरली. यासह पियुष निमजे, कार्तिका कडू, अथर्व जोशी यांना रोख पुरस्कार व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. स्पर्धा परिक्षक म्हणून सुभाष कुबडे, ज्योत्सना भेंडे, अर्चना देशमुख, वसु यांनी काम पाहिले. संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन दीपमाला कुबडे यांनी केले. यावेळी शिक्षक व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाला ग्रंथालय कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Perception of social problems taken from Panchalya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.