३०० युनिटपर्यंत विजेचे देयक कायमस्वरूपी माफ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 05:00 AM2019-12-23T05:00:00+5:302019-12-23T05:00:55+5:30

३०० युनिटपर्यंत विद्युत देयके कायमस्वरूपी माफ करावीत, यानंतर ३०० युनिटपर्यंत कुणालाही वीज बिलाचा भुर्दंड सोसावा लागणार नाही, नाही अशी तजविज राज्य शासनाने करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अध्यक्ष डॉ. उमेश वावरे यांनी दिला आहे.

Permanent forgiveness of electricity up to 300 units | ३०० युनिटपर्यंत विजेचे देयक कायमस्वरूपी माफ करा

३०० युनिटपर्यंत विजेचे देयक कायमस्वरूपी माफ करा

Next
ठळक मुद्देवंचित बहुजन आघाडी : महसूलमंत्र्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : राज्य वीज उत्पादनात सक्षम असूनही वीज वितरण कंपनी किमान ३०० युनिटपर्यंत सामान्य नागरिकांवर आगाऊ बिलाचा बोजा देत आहे. सरकारने किमान ३०० युनिटपर्यंत विद्युत देयके कायमस्वरूपी माफ करावीत, यानंतर ३०० युनिटपर्यंत कुणालाही वीज बिलाचा भुर्दंड सोसावा लागणार नाही, नाही अशी तजविज राज्य शासनाने करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अध्यक्ष डॉ. उमेश वावरे यांनी दिला आहे.
ग्रामीण भागात शेतकरी, शेतमजुरांची संख्या मोठी आहे. सर्वसामान्यांचा विचार करता सरकारने निर्णय घ्यावा, अन्यथा वीज देयके भरणे बंद करावे लागेल, असेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी दिलीप कहूरके, प्रफुल्ल वाघाडे, चारूदत्त आटे, मनीष कांबळे, प्रफुल्ल उईके, शेख जानी शेख रूस्तम, प्रमोद कोसुरकार, राजू मिरासे, लियाकत अली शौकत आली, रोशनसिंग गौर, मनोहर भगत, टोनू सहारे, विनोद रेडलावार, भय्याजी घोडे, विजय फुलझेले, नासीर अली, शेखर दरबेसवार, विनोद फुलमाळी, गजानन चितल्लरवार, प्रशांत शंभरकर, प्रदीप माणिकपुरे, दिलीप कांबळे, देवेंद्र भालशंकर, रघुनाथ सिडाम, तुळशीदार पोहणकर, आनंद नेहारे, विठ्ठल बतकल उपस्थित होते.

Web Title: Permanent forgiveness of electricity up to 300 units

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज