आदिवासी बांधवांना कायमस्वरूपी पट्टे द्या
By admin | Published: August 14, 2016 12:30 AM2016-08-14T00:30:21+5:302016-08-14T00:30:21+5:30
मौजा जुनापाणी सर्वे नं. ६२/२ व ६२/१ मध्ये अनु. जाती/जमाती व इतर मागासवर्गीय लोक गेल्या ५ ते २० वर्षांपासून भोगवटदार २ मध्ये राहत आहे.
मागणी : आदिवासी बिरसा मुंडा अधिकारचे निवेदन
वर्धा : मौजा जुनापाणी सर्वे नं. ६२/२ व ६२/१ मध्ये अनु. जाती/जमाती व इतर मागासवर्गीय लोक गेल्या ५ ते २० वर्षांपासून भोगवटदार २ मध्ये राहत आहे. शासन, प्रशासनाकडून आजतागायत आदिवासी जाती-जमाती लोक शासकीय सुविधांपासून वंचित आहेत. वन हक्क कायद्यानुसार पुनर्वसनासारखी व्यवस्था व स्थायिक नागरिकत्व पट्टे देण्यााची मागणी आदिवासी बिरसा मुंडा अधिकार व शिक्षा समितीने निवेदनातून केली.
मुंबई येथील अनुसूचित जाती/जमाती आयोगाच्या अध्यक्षांचे तात्काळ सुनावणीच्या १९ फेब्रुवारी २०१४ रोजीच्या पत्र क्रं. ५०७ वर अंमलबजावणी करण्यात यावी. आदिवासी (मुलवासी) वनहक्क कायद्यानुसार निवासी आवारामध्ये बिरसा मुंडा स्थळ स्थापनेकरिता जागा उपलब्ध करुन देण्यात यावी. बिरसानगर नाव घोषित करावे. आदिवासी वनहक्क कायद्यानुसार निवासी आवारामध्ये स्थाईक नागरिकांना पट्टे देण्यात यावे., अप्पर आयुक्त, आदिवासी विभाग, नागपूर यांच्या पत्राची अंमलबजावणी करण्यात यावी, आदिवासी(मुलवासी) वन हक्क कायद्यानुसार अनु. जाती/ जमाती व इतर मागासवर्गीय मुलांचा विकास व्हावा, निवासी आवारामध्ये पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमातून कॉन्व्हेंट स्कूल करीता जागा उपलब्ध करुन देण्यात यावी, या मागण्यांकडे निवेदनातून लक्ष वेधण्यात आले.(जिल्हा प्रतिनिधी)