सोशल मिडियावर महिलांची बदनामी करणारा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 05:07 PM2018-05-16T17:07:46+5:302018-05-16T17:07:55+5:30

फेसबुकवर महिलांचे खोटे आयडी तयार करून बदनामी करणारा मजकूर टाकणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने नांदेड येथून अटक केली. मच्छिंद्र बळीराम कावडे (३७) रा. इश्वरनगर नांदेड, असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

person arrested, who defamed women on social media | सोशल मिडियावर महिलांची बदनामी करणारा अटकेत

सोशल मिडियावर महिलांची बदनामी करणारा अटकेत

Next
ठळक मुद्देफेसबुकवरून घेत होता महिलांचे फोटो व माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : फेसबुकवर महिलांचे खोटे आयडी तयार करून बदनामी करणारा मजकूर टाकणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने नांदेड येथून अटक केली. मच्छिंद्र बळीराम कावडे (३७) रा. इश्वरनगर नांदेड, असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
सिंदी (रेल्वे) पोलीस ठाण्यात २७ सप्टेंबर २०१७ रोजी महिलेच्या तक्रारवरून माहिती तंत्रज्ञान कायदा सहकलम ६७ तथा भादंविच्या कलम ५०१ अन्वये गुन्हा दााखल करण्यात आाला होता. यात ज्ञात आरोपीने फिर्यादीच्या नावाने खोटे फेसबुक अकाऊंट तयार करून बदनामीकारक मजकूर टाकला. या प्रकरणी सिंदी रेल्वे व सायबर पोलीस ठाणे वर्धाने त्वरित तपास करीत बदनामीकारक फेसबुक अकाऊंट बंद करून आरोपीचा शोध सुरू केला. गुन्हा दाखल झाल्यानंतरही सदर आरोपी वेळोवेळी फिर्यादी व तिच्या संबंधित व्यक्तीच्या नावाने खोटे फेसबुक अकाऊंट तयार करून त्यांची बदनामी करण्याचे काम करीत होता. आरोपी हा फेसबुकसोबतच व्हॉटस् अ‍ॅपद्वारेही फिर्यादी व तिच्या संबंधित व्यक्तींना त्रास देत होता.
याप्रकरणी फेसबुक, व्हॉटस् अ‍ॅप व मोबाईल कंपन्यांकडून माहिती घेतली असता आरोपी नांदेड येथे वास्तव्यास असल्याचे कळले. त्याची इत्यंभूत माहिती घेण्यासाठी पोलीस पथक नांदेड येथे रवाना झाले. सायबर पोलीस ठाण्याने तांत्रिक पद्धतीने असलेल्या या गुन्ह्याचा तपास करून आरोपी मच्छिंद्र बळीराम कावडे (३७) रा. इश्वरनगर नांदेड याला शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेतले. त्याला तपासी अधिकाऱ्यांसमक्ष हजर करण्यासाठी वर्धा येथे आणण्यात आले. अधिक चौकशी केली असता त्याच्या ताब्यातून जप्त केलेल्या मोबाईलमध्ये बरीच माहिती आढळून आली.
प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून फॉरेन्सीक रिपोर्टवरून अधिक माहिती घेण्यात येत आहे. संबंधित पीडित महिलांना पोलिसांमार्फत संपर्क करण्यात येत असून त्यावरून अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. प्रकरणाचा पुढील तपास सिंदी (रेल्वे) पोलीस करीत आहे.

फेसबुकवरून घेत होता महिलांचे फोटो व माहिती
आरोपी मच्छिंद्र कावडे हा फेसबुक व व्हॉटस् अ‍ॅपवरून महिलांचे फोटो व त्यांची माहिती घेत होता. त्यांच्याशी महिला म्हणून चॅटींग करून त्यांचे व त्यांच्या परिवाराबाबत तथा मित्रपरिवाराबाबत माहिती घेत होता. त्यांना संपर्कही करीत होता. शिवाय पीडितेची बदनामी करणारे मॅसेज, अश्लील फोटो, व्हीडीयो व्हॉटस् अ‍ॅपवर प्रसारित करीत होता. याच दरम्यान त्याला फिर्यादीच्या फेसबुकवरून तिचा फोटो मिळाला. त्याने तिचे खोटे अकाऊंट तयार करून तिला व तिच्या संबंधित व्यक्तींना त्रास देणे सुरू केले. त्याच्या मोबाईलमध्ये मुंबई, पुणे, गोवा, लातूर, बीड, नांदेड, नागपूर, गडचिरोली व वर्धा येथील अनेक महिलांचे फोटो सापडलेत. बऱ्याच महिलांसोबत तो व्हॉटस् अ‍ॅप व फेसबुकद्वारे अश्लील चॅटींग करीत असल्याचे उघडकीस आले.

सोशल मिडीयावरील अकाऊंट स्वत: वापरा
आपले फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅपचे फोटो, व्हीडीयो आपल्या कॉन्टॅक्टमधील लोकांशिवाय कोणत्याही अनोळखी व्यक्तीला दिसू नये म्हणून सोशल नेटवर्कींग साईटवर सेटींग पुरविण्यात येत असते. याबाबत अनेकांना ज्ञान नसल्याने असे गुन्हे घडून महिलांना त्रास सहन करावा लागतो. यासाठी वर्धा पोलिसांकडून नेहमी जनजागृती केली जाते. याबाबत अधिक माहितीकरिता वर्धा पोलीस फेसबुक पेज, टष्ट्वीटर हॅन्डलवर फॉलो करण्याचे आवाहन वर्धा पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Web Title: person arrested, who defamed women on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.