कमळाचे फुल देऊन रायुकॉद्वारे पेट्रोल दरवाढीचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 11:36 PM2018-05-23T23:36:30+5:302018-05-23T23:36:30+5:30
पेट्रोल व डिझेलची सातत्याने दरवाढ होत आहे. या दरवाढीमुळे सर्वस्तरातून संताप व्यक्त होत आहे. ८५.१८ रुपये लिटर पेट्रोल व ७१.६६ रुपये लिटर डिझेलचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती घसरल्या असताना पेट्रोल व डिझेलचे दर वाढत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पेट्रोल व डिझेलची सातत्याने दरवाढ होत आहे. या दरवाढीमुळे सर्वस्तरातून संताप व्यक्त होत आहे. ८५.१८ रुपये लिटर पेट्रोल व ७१.६६ रुपये लिटर डिझेलचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती घसरल्या असताना पेट्रोल व डिझेलचे दर वाढत आहे. यातही महाराष्ट्रात सर्वाधिक दर आहे. याविरूद्ध बुधवारी सकाळी १० वाजता बजाज चौकात रायुकाँने प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख यांच्या नेतृत्वात पेट्रोल पंपांवरील वाहन चालकांना कमळाचे फुल देत अभिनव पद्धतीने आंदोलन करीत पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध केला.
भाजपाला सत्तेवर येण्यापूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रती बॅलर ११० डॉलरपेक्षा अधिक भाव असताना देशात ७० रुपये लिटर पेट्रोल व ४५ रुपये लिटर डिझेल चालत नव्हते. यासाठी आंदोलन केले होते. ‘बहुत हो गई पेट्रोल और डिझेल की मार’, असे म्हणत भाजपाने सत्ता मिळविली आणि सेत्तेवर येताच पेट्रोल व डिझलचे भाव वाढविले आहे. ८५.१८ रुपये पेट्रोल व ७१.६६ रुपये डिझेलचे भाव म्हणजे १४० टक्के अधिक भावाने विक्री होत आहे. हे सरकार सामान्यांच्या जीवावर उठले असून उद्योजकांचे हित साधणारे असल्याचे जिल्हाध्यक्ष संदीप किटे यांनी सांगितले.
कमळाचे फुल देऊन पेट्रोल दरवाढीचा निषेध करताना नागरिकांनी, मोदी सरकारने आमची फसवणूक केली. सत्तेवर आल्यास भ्रष्टाचार व महागाई कमी करू, असे आश्वासन दिले होते. चार वर्षे होऊनही काही कमी झाले नाही. उलट प्रचंड महागाई वाढली आहे. हजारो कोटीचा भ्रष्टाचार उघडकीस येत आहे. पेट्रोल भरणे आमच्या आवाक्याच्या बाहेर झाले असून मोदी सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो, अशी प्रतिक्रिया दिली. पेट्रोल पंप चालकांनीही लिटर मागे मिळणारा नफा हा अत्यल्प असून सर्व कर हे राज्य व केंद्र शासनाला द्यावे लागतात. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर वाढले तरच पेट्रोल व डिझल वाढत होते आणि कमी झाले तर दर कमी होत होते; पण आता असे होताना दिसत नाही. उलट भाव वाढत असल्याच्या प्रतिक्रीया नोंदविल्या.
आंदोलनात समिर देशमुख, संदीप किटे, शरयू वांदिले, सोनल ठाकरे, अजय गौळकर, प्रफूल मोरे, संदेश किटे, अर्चित निघडे, विनय डहाके, अंबादास वानखेडे, बाबाराव खाडे, टी. सी. राऊत, मधुकर टोणपे, उत्कर्ष देशमुख, विना दाते, कुमूद लाजुरकर, शारदा केने, दुर्गा धूरत यासह रायुकाँचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.