आईसक्रीमच्या फॅमिली पॅकमध्ये काचेचा तुकडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 09:50 PM2018-06-13T21:50:50+5:302018-06-13T21:50:50+5:30

फॅमिली पॅकमधील अमूल कंपनीचे आईसक्रीम कुटुंबियांसोबत खात असताना एक मोठा काचेचा धारदार तुकडा लहान मुलीच्या तोंडात आढळून आला. काचेच्या तुकड्यामुळे तिचे तोंड रक्तबंबाळ झाले.

A piece of glass in the ice cream family pack | आईसक्रीमच्या फॅमिली पॅकमध्ये काचेचा तुकडा

आईसक्रीमच्या फॅमिली पॅकमध्ये काचेचा तुकडा

googlenewsNext
ठळक मुद्देलहान मुलीचे तोंड रक्तबंबाळ : कंपनीला सील लावण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : फॅमिली पॅकमधील अमूल कंपनीचे आईसक्रीम कुटुंबियांसोबत खात असताना एक मोठा काचेचा धारदार तुकडा लहान मुलीच्या तोंडात आढळून आला. काचेच्या तुकड्यामुळे तिचे तोंड रक्तबंबाळ झाले. कुटुंबातील सर्व जण एकत्र आईसक्रीम खात असताना त्यांच्या ही बाब लक्षात आली. संबंधित दुकानदाराकडे धाव घेत सहायक आयुक्त अन्न व औषधी प्रशासन विभाग यांच्याकडे तक्रार केली. लोकांच्या जीवावर उठलेली ही कंपनी सीलबंद करावी, या कंपनीचा आईसक्रीमचा माल नष्ट कराा, अशी मागणी करण्यात आली.
स्थानिक आंबेडकर वॉर्ड येथील अमर रामकृष्ण मुरार यांनी देवळीतील एका दुकानदाराकडून एक किलो वजन असलेले अमूल कंपनीचे ‘फ्रुट अ‍ॅण्ड नट फन्टासी’ आईसक्रीम विकत घेतले. आईसक्रीमचा फॅमिली पॅक घरी आणून कुटुंबातील सर्वजण एकत्र बसून खात होते. दरम्यान, आईसक्रीम सोबतच एक मोठा काचेचा धारदार तुकडा लहान मुलीच्या तोंडात गेला. आईसक्रीम खात असताना या मुलीच्या तोंडातून रक्त येत असल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले. तोंडात बोट टाकून चाचपणी केली असता एक मोठा काचेचा धारदार तुकडा आढळून आला. ही बाब त्वरित लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला.
कुटुंबीयांसाठी ही घटना अंगाचा थरकाप उडविणारी होती, अशी भावना मुरार यांनी तक्रारीत नमूद केली आहे. खाद्यपदार्थाच्या नामवंत कंपन्यांकडूनही जीवितास धोका निर्माण होऊ शकतो हीच बाब या माध्यमातून समोर आली आहे. या घटनेमुळे या कंपनीचा बाजारामध्ये असलेला संपूर्ण माल नष्ट करण्यात यावा. तसेच या कंपनीचे आईसक्रीमचे उत्पादन बंद करण्यात यावे, अशी मागणी मुरार यांनी तक्रारीतून केली आहे. याबाबत कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काचेचा तुकडा सापडलेला आईसक्रीमचा बॅच सील करून अ‍ॅनालिसीससाठी पाठविला आहे. अमूल आईसक्रीमच्या संपूर्ण स्टॉकची तपासणी करून संबंधितांना पत्र देण्यात आले आहे. तपासणीचा अहवाल आल्यानंतर कारवाई करण्यात येणार आहे.
- रवीराज धाबर्डे, सहायक आयुक्त, अन्न व औषधी प्रशासन, वर्धा.

Web Title: A piece of glass in the ice cream family pack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.