मदना ते मदनी रस्त्याची दैना
By admin | Published: June 30, 2017 01:50 AM2017-06-30T01:50:05+5:302017-06-30T01:50:05+5:30
मदना ते मदनी हा अडीच किलोमिटरच्या रस्त्याची दैनावस्था झाली असून येथून दळण वळण करणे त्रासदायक ठरत आहे.
दुरूस्तीकरिता जिल्हा प्रशासनाला युवा परिवर्तनचे साकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मदना ते मदनी हा अडीच किलोमिटरच्या रस्त्याची दैनावस्था झाली असून येथून दळण वळण करणे त्रासदायक ठरत आहे. यामुळे रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे. गावकऱ्यांच्या मागणीकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
अनेक समस्यांचा असलेला हा रस्ता दुरूस्त करण्यातची मागणी होत असताना जिल्हा प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे आणि खड्ड््यात साचत असलेल्या पाण्यामुळे येथून वाहन चालविणे अवघड होत आहे. या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे गावात परिवहन महामंडळाची बसही येणे बंद झाले आहे. याकडे लक्ष देण्याकरिता युवा परिवर्तन की आवाज संघटनेने निवासी उपजिल्हाधिकारी जोशी यांना निवेदन सादर केले. यावेळी प्रीती घंघाळ, प्रगती देशकर, रागिनी शर्मा, नंदीनी गुप्ता, पल्लवी देशकर,अंकिता थुल, समीक्षा संगीतराव, जयंती मिश्रा, किसान घंघाळ, अमित धोपटे, अशोक पुरी, विठ्ठल घोडखांदे, श्रीकृष्ण मसराम व मदना नागरिक करतात,
रस्ता की डबके
सध्या पावसळा सुरू आहे. रस्त्यावर मोठ मोठ खड्डे पडले आहे. या खड्ड्यात पावसाचे पाणी साचत असल्याने रस्त्याला डबक्याचे स्वरून प्राप्त झाले आहे. यामुळे रस्त्याने जाताना आपण डाबक्यातून जात असल्याचा अनुभव आल्याशिवाय राहत आहे. या रस्त्याने जाताना केव्हा तुमचे चिखलाने माखल्या जाईल याचा नेम नसल्याने हा रस्ता दुरूसत करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी गावात जोर धरू लागली आहे.