पिपरीच्या पांदण रस्ता कामात गैरप्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 10:28 PM2018-07-23T22:28:11+5:302018-07-23T22:29:15+5:30
लिंगा (मांडवी) या रस्त्याच्या बाजूला असलेल्या पिपरी येथील पांदण रस्त्याचे काम नरेगा शासकीय योजनेतून ११ लाख रूपये खर्चून करण्यात आले. सदर काम निकृष्ठ दर्जाचे झाले असून इस्टीमेटनुसार हे काम झाले नाही. या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा (घा.) : लिंगा (मांडवी) या रस्त्याच्या बाजूला असलेल्या पिपरी येथील पांदण रस्त्याचे काम नरेगा शासकीय योजनेतून ११ लाख रूपये खर्चून करण्यात आले. सदर काम निकृष्ठ दर्जाचे झाले असून इस्टीमेटनुसार हे काम झाले नाही. या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
सदर पांदण रस्त्यावर मुरुम व गिट्टीचा वापर करणे अनिवार्य होते. परंतु त्याच्याऐवजी केवळ माती टाकण्यात आली. त्यामुळे पांदन रस्त्याचे काम होण्यापूर्वी येण्या-जाण्यास सहज सुलभता होती. परंतू काम झाल्यापासून पायी चालनेही कठीण झाले आहे.
या पांदण रस्त्याच्या निकृष्ठ कामामुळे शेतकºयांची डोकेदुखी वाढली आहे. या रस्ताकामात गैरप्रकार झाला असून याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी गावकºयांनी केली. या संदर्भात पिपरी ग्रामपंचायतचे सचिव बन्नगरे यांना विचारणा केली असता त्यांनी या कामासाठी ११ लाख रूपयापैकी अडीच लाख रूपये निधी शासनाकडून आतापर्यंत आला. उर्वरीत ८.५० लाख रूपये निधी येणे बाकी आहे. या कामात कुठलाही गैरप्रकार झालेला नाही. तसेच अजूनही काम पूर्ण झालेले नाही, अशी माहिती दिली. त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाळ्यात त्रास सहन करावा लागत आहे.
पांदण रस्त्याने वाढविली अडचण
शेतकऱ्यांचा त्रास दूर व्हावा याकरिता जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी पांदण रस्ता विकास कार्यक्रम राबविला. पांधन रस्ते मोठे झाले. बाजूला नाल्या झाल्या पण पावसाळ्यात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना शेती साहित्य बंडीतून नेणे कठीण झाले आहे.
कामाची तक्रार आपल्याकडे आली असून विस्तार अधिकारी व अभियंता यांना प्रत्यक्ष कामाच्यास्थळी जावून पंचनामा करण्यास सांगितले आहे. या कामात कुशल आणि अकुशल असे दोन प्रकारचे कामे असतात. दोनही निधी वेगवेगळे असतात. त्यामुळे कोणत्या कामावर किती निधी खर्च झाला, याची चौकशी केली जाईल.
-उमेश नंदागवळी, संवर्ग विकास अधिकारी, पंचायत समिती, कारंजा.