अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्यासाठी जागा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 10:12 PM2019-07-19T22:12:05+5:302019-07-19T22:13:43+5:30
आष्टी येथील अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी जागा देण्यात यावी या मागणीकरिता युवा स्वाभिमान पार्टीचे विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी तळेगाव श्यामजीपंत येथे नागपूर -मुंबई महामार्गावर आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
तळेगाव (श्यामजीपंत) : आष्टी येथील अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी जागा देण्यात यावी या मागणीकरिता युवा स्वाभिमान पार्टीचे विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी तळेगाव श्यामजीपंत येथे नागपूर -मुंबई महामार्गावर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात अण्णाभाऊ साठे स्मारक समिती, लहुजी शक्ती सेना, मानवहित लोकशाही पक्ष, राष्ट्रीय लहू शक्ती बहुजन रयत परिषद, भिम टायगर सेना आम आदमी पाटी आदींनी सक्रिय सहभाग घेतला. यावेळी प्रचंड नारेबाजी करण्यात आली.
ये आझादी झुठी है देश की जनता भुकी है , अण्णा भाऊ साठे यांचा पुतळ्याच्या जागेचा प्रश्न निकाली निघालाच पाहिजे, आष्टी येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या प्रकरणात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही झालीच पाहिजे असे नारे देण्यात आले. या आंदोलनामुळे पोलीस प्रशासनाची तारांबळ उळाली व काही काळ महामार्गावर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. मागील ४० वर्षांपासून अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा आष्टी येथे वनविभाग कार्यालयाजवळ उभा करण्यात आला आहे. परंतु शासन प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अनेक वर्षापासून अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा खितपत पडलेला आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे सौंदर्र्यीकरण व्हावं यासाठी मातंग समाज संघटना आक्रमक झाल्या आहेत. मागील दोन वर्षांपासून या प्रश्नाला निकाली काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आंदोलनाच्यावेळी दिलीप पोटफोडे यांच्या नेतृत्वात लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष विनय इंगळे, भिम टायगरचे दर्पण टोकसे, बहुजन रयत परिषदेचे दिगंबर सेनेसर, राष्ट्रीय लहू शक्तीचे सुधाकर वाघमारे, मानवहीतचे ईश्वर गायकवाड, रणजित पोटफोडे रामकृष्ण गायकवाड, नितीन तायवाडे आपचे ऋषभ निस्ताने उपस्थित होते. जिल्हा प्रशासनाने हा प्रश्न त्वरित मार्गी लावावा अन्यथा शासनाविरूध्द तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी विविध संघटनांच्यावतीने देण्यात आला. आंदोलनाच्या वेळी कमलेश चिंधेकर, सिद्धार्थ कळंबे, राहुल विरेकर, संजय कांबळे, नानाभाऊ बोभाटे, अरुण लांडगे, बबन गायकवाड, राहुल प्रधान, गोपाल गिरडकर, मंगेश लांडगे, प्रेम खंडाळकर, अजय गायकवाड, अनिल कांबळे, रमेश राऊत, मंगेश प्रधान, देवरावजी प्रधान, सचिन प्रधान, शेखर तिरडे, आशिष अवचार, प्रभाकर लांडगे, सुधाकर लांडगे, रवींद्र वानखेडे, संजय पोटफोडे, बबलू धानोरकर आदीसह मातंग समाज कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.