आरोपींचा पुरावा नष्ट करण्याचा बेत
By admin | Published: February 7, 2017 01:10 AM2017-02-07T01:10:03+5:302017-02-07T01:10:03+5:30
तालुक्यातील तरोडा येथील सीमा मुन्ने हिला तिचा पती, सासू व सासऱ्याने माहेरवरून पैसे आणण्याचा लागवून जाळून मारल्याचे समोर आले.
सीमा जळित प्रकरण : सासू अद्याप फरारच
कारंजा (घाडगे) : तालुक्यातील तरोडा येथील सीमा मुन्ने हिला तिचा पती, सासू व सासऱ्याने माहेरवरून पैसे आणण्याचा लागवून जाळून मारल्याचे समोर आले. तिच्या घरचे एवढ्यावाच थांबले नाही तर तिची झालेली राख शिरवून पुरावा नष्ट करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे समोर येत आहे. या प्रकरणी पती व सासूला पोलिसांनी अटक केली असून सासू अद्याप फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
तरोडा येथे शनिवारी (दि.४) सीमा मुन्ने हिला तिच्या सासरच्या मंडळींनी पैशाकरिता जाळून मारल्याचा आरोप तिच्या आईने पोलिसांना दिलेल्या तक्रारीतून केला. या प्रकरणी तक्रार येताव पोलिसांनी पती अमोल मुन्ने आणि सासरा काशिनाथ मुन्ने या दोघांना अटक करण्यात आली. मात्र सीमाची सासू अद्याप फरार असल्याचे सांगण्यात आले आहे. जाळण्यापूर्वी सीमाला तिच्या कुटुंबियांनी अनेक त्रास दिल्याची चर्चा परिसरातील नागरिक करीत आहेत. घरातून जळाल्याचा धुर दिसल्याने घटना उघडकिस आली. या बाबत नेमके काय ते शवविच्छेदन अहवालानंतरच कळेल, असे पोलिसांनी सांगितले.(शहर प्रतिनिधी)