वर्ध्यातील कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये कोविड रूग्णांसाठी प्लाज्मा संग्रहण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 03:19 PM2020-08-20T15:19:09+5:302020-08-20T15:19:32+5:30

सेवाग्राम येथील कस्तुरबा हॉस्पिटलची ब्लड बँक आणि महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या संस्थेने गुरुवार २० ऑगस्टपासून कोविड प्लाज्मा संकलन सुरू केले आहे.

Plasma collection for Kovid patients started at Kasturba Hospital in Wardha | वर्ध्यातील कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये कोविड रूग्णांसाठी प्लाज्मा संग्रहण सुरू

वर्ध्यातील कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये कोविड रूग्णांसाठी प्लाज्मा संग्रहण सुरू

googlenewsNext
ठळक मुद्देनागपूर विभागात नागपूर नंतरचा वर्धा दुसरा जिल्हा

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: सेवाग्राम येथील कस्तुरबा हॉस्पिटलची ब्लड बँक आणि महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या संस्थेने गुरुवार २० ऑगस्टपासून कोविड प्लाज्मा संकलन सुरू केले आहे. कोविड -१९ संसर्गातून मुक्त झालेल्या व्यक्तींमध्ये रक्तात अँटीबॉडी तयार होत असतात, ज्या कोरोना विषाणूंविरूद्ध लढायला मदत करतात. कोरोना विषाणू संसर्गग्रस्त रूग्णांमध्ये बरे झालेल्या रुग्णाच्या रक्तातील प्लाज्मामुळे त्यांची रोग प्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते आणि रुग्ण कोरोनातून लवकर बरा होतो. या सुविधेमुळे कोरोना संसर्गित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढणार असून अशी सुविधा उपलब्ध असलेला वर्धा हा विभागातील दुसरा जिल्हा आहे.

कोरोनातून बरे झालेले उपजिल्हाधिकारी मनोज खैरनार हे प्रथम प्लाज्मा दाता होते. तसेच कोविड संसगार्पासून बरे झालेले सुधांशु डूकरे, यांनीही प्लाज्मा दान केले.

जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांच्या उपस्थितीत प्लाज्मा दान करण्यास सुरुवात झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओंबासे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले उपस्थितीत होते. कस्तुरबा हेल्थ सोसायटीचे विश्वस्त पी.एल. तापडिया, कस्तूरबा हेल्थ सोसायटी, सेग्रामचे सचिव डॉ. बी.एस. गर्ग, एम.जी.आय.एम.एस सेवाग्रामचे डीन डॉ. नितीन गंगणे, पॅथॉलॉजी विभागातील प्राध्यापक व प्रमुख डॉ. अनुपमा गुप्ता, ब्लड बँकेचे प्राध्यापक व प्रभारी व्ही.बी. शिवकुमार उपस्थित होते.


रुग्णालयातून सुटी झाल्यावर 28 दिवसांच्या कालावधी नंतर कोविड आजारातून बरे झालेल्या व्यक्ती प्लाज्मा दान करण्यास पात्र आहेत. प्लाज्मा दान करण्यासाठी सुमारे 45-60 मिनिटे लागतात. कोरोनातून बऱ्या झालेल्या व्यक्तीनी प्लाज्मा दान करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. एमजीआयएमएस सेवाग्राम व कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये कोविड संसर्गाचे निदान व उपचारासाठी सर्व आवश्यक सुविधेसोबतच आता प्लाज्मा उपचारही उपलब्ध आहे.

Web Title: Plasma collection for Kovid patients started at Kasturba Hospital in Wardha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.