पत्रावळींमुळे पशुधनाला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 01:13 PM2019-05-11T13:13:56+5:302019-05-11T13:16:16+5:30

लग्न समारंभापासून तर छोटेखानी कार्यक्रमातील पत्रावळी रस्त्यावर टाकल्या जात असून त्या जनावरे खातात़ यामुळे जनावरांना गंभीर स्वरूपाचे आजार होत आहेत़ प्रसंगी जनावरे मृत झाल्याची अनेक उदाहरणे आहेत़

Plastic plates injurious for cows | पत्रावळींमुळे पशुधनाला धोका

पत्रावळींमुळे पशुधनाला धोका

Next
ठळक मुद्देवैरण टंचाईचा परिणाम गुरांमध्ये पोटाचे आजार बळावले

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : लग्न समारंभापासून तर छोटेखानी कार्यक्रमातील भोजनासाठी पत्रावळी, द्रोण, कप, ग्लास यांचा वापर अगदी शहरासह ग्रामीण भागातही होतो़ आधुनिकतेमुळे वेळेची बचत होत असली तरी यामुळे पर्यावरणाचा ºहास होतो़ या पत्रावळी रस्त्यावर टाकल्या जात असून त्या जनावरे खातात़ यामुळे जनावरांना गंभीर स्वरूपाचे आजार होत आहेत़ प्रसंगी जनावरे मृत झाल्याची अनेक उदाहरणे आहेत़
पूर्वी लग्नप्रसंगी व इतर कार्यक्रमातील जेवणाकरिता वड, पळस, मोह आदींच्या पानांपासून पत्रावळी व द्रोण तयार केले जात होते़ या पत्रावळीवर जेवणाची लज्जत काही वेगळीच होती़ या पत्रावळीमुळे ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध होत होता़ या पत्रावळी जमिनीत कुजून जायच्या वा जनावरांनी खाल्यास काही अपाय होत नव्हता़ एकंदरीत पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होत होती़ आता मात्र आधुनिकतेच्या नावाखाली चमकणाऱ्या वाट्या, ग्लास वाढले आहेत़ यामुळे नैसर्गिकरित्या वृक्षाच्या पानांपासून तयार केलेले द्रोण व पत्रावळी काळाच्या ओघात लुप्त होत आहेत़ विविध कार्यक्रमांत वापरण्यात येणारे द्रोण, कप, पत्रावळी कार्यक्रमानंतर खुल्या जागेत फेकल्या जातात़ प्लास्टिकचे विघटन होत नसल्याने ते ‘जैसे थे’च राहतात़ परिणामी, प्लास्टिक पत्रावळींमुळे पशुधन धोक्यात आल्याचे दिसते़ यामुळे या प्लास्टिकच्या पत्रावळी इतरत्र न फेकता नष्ट करणे गरजेचे झाले आहे़

सणालाही प्लास्टिकच्या पत्रावळी
पूर्वज पूजनाचा सण म्हणून अक्षयतृतियेला मान आहे़ या दिवशी वृक्षाच्या पानापासून तयार केलेल्या पत्रावळी, द्रोण यावर अन्नपदार्थ मांडून पूजनाचा मान आहे; पण आता त्या मिळत नसल्याने प्लास्टिक पत्रावळींवरच पूजन केले जाते़
सणाच्या दिवशीही पत्रावळी मिळत नसल्याने प्लास्टिकच्या वस्तूच वापरल्या जातात़

Web Title: Plastic plates injurious for cows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.