धनगरांना आधी आरक्षण द्या, नंतरच कर्मचाऱ्यांची मेगाभरती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 12:25 AM2018-12-16T00:25:16+5:302018-12-16T00:26:32+5:30
धनगर समाजाला एस.टी मध्ये आधी आरक्षण द्यावे, त्यानंतरच सरकारने कर्मचाऱ्यांची मेगाभरती करावी. अन्यथा धनगर समाज सेवा संस्थेच्यावतीने भाजपाच्या खासदार व आमदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करून शासनाचा निषेध करण्यात येईल असा इशारा धनगर समाज सेवा संस्थेच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकाऱ्यामार्फत दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : धनगर समाजाला एस.टी मध्ये आधी आरक्षण द्यावे, त्यानंतरच सरकारने कर्मचाऱ्यांची मेगाभरती करावी. अन्यथा धनगर समाज सेवा संस्थेच्यावतीने भाजपाच्या खासदार व आमदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करून शासनाचा निषेध करण्यात येईल असा इशारा धनगर समाज सेवा संस्थेच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकाऱ्यामार्फत दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
राज्य व केंद्र सरकारने २०१४ च्या निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची पुर्तता अद्यापही केली नाही. राज्यात धनगर समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेतील ३६ व्या क्रमांकावर अनुसूचित जमातीचे आरक्षण दिले आहे. परंतु त्याची अंमलबजावणी ७० वर्षानंतर देखील झाली नाही. राज्यातील मेंढपाळ व शेळीपालन करणाºयांना वनराई क्षेत्रात चराईच्या पासेसची व्यवस्था अजूनही उपलब्ध करून दिली नाही. धनगर समाजाला २० मेंढ्यामागे पाच एकर क्षेत्र उपलब्ध करून द्यावे, हे सुध्दा निवेदनात नमूद केले आहे. राज्य सरकारने आगामी निवडणुकीपूवी धनगर आरक्षणाचा प्रश्न न सोडविल्यास भाजपला धडा शिकवू असा इशारा देण्यात आला. निवेदन देतांना धनगर समाज संस्थेचे जिल्हाध्यक्ष जितू गोरडे, योजना ढोक, अहिल्याक्रांती संघटनेच्या जिल्हाध्यक्षा प्रेमलता बुरंगे, रामेश्वर लांडे, विनायक नन्ननवरे, अनुप सरोदे, सतीश निखार, मोघे, दिवाकर थोटे, विठ्ठल गराड, बाबाराव उघडे, माणिकराव बुरांडे, बाळकृष्ण गराड, केशव नन्ननवरे, महादेव ढवळे, ढोकणे, किशोर ढवळे आदींची उपस्थिती होती.