पंतप्रधानांनी शहीद परिवाराची जाहीर माफी मागावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 10:29 PM2019-04-20T22:29:31+5:302019-04-20T22:31:03+5:30
शहीद हेमंत करकरे याचा अवमान करणाºया मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंगला देशद्रोही घोषित करून कारवाई करावी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहीद परिवाराची माफी मागावी, अशी मागणी विविध सामाजिक संघटनांनी राष्ट्रपतींना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहीद हेमंत करकरे याचा अवमान करणाºया मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंगला देशद्रोही घोषित करून कारवाई करावी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहीद परिवाराची माफी मागावी, अशी मागणी विविध सामाजिक संघटनांनी राष्ट्रपतींना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
या घटनेसंदर्भात शहरातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर निदर्शनेही करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर करण्यात आले. यावेळी सुनील ढाले, भरत कोकावार, पंकज सत्यकार, समीर राऊत, अविनाश काकडे, नूतन माळवी, सुधीर पांगुळ, पंकज इंगोले, विनय राहाटे, विक्की सवाई, कमलाकर पिंगळे, सतीश देवढे, रमेश आत्राम, विशाल हजारे, सुधीर देशमुख, विनोद चौधरी, चंद्रशेखर बुरांडे, दीपक देशमुख, प्रशांत झाडे, मिलिंद मोहोड, प्रभाकर धोटे, पंकज इंगोले आदी उपस्थित होते.
२६/११ च्या दहशतवादी हल्यामध्ये तत्कालीन एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले. त्यांचे बलिदान हे देशातील भावी पिढीसाठी प्रेरणादायी आहे. मात्र, भारतीय जनता पक्षाच्या भोपाळ येथील लोकसभा उमेदवार व मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंग हिने शहीद हेंमत करकरे यांना दहशतवादी संबोधून संपूर्ण शहिदांचा व त्यांच्या परिवाराचा अवमान केला आहे. प्रज्ञा सिंग हिचे वक्तव्य देश विघातक असल्याने तिला देशद्रोही घोषित करून कारवाई करावी, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहीद परिवाराची व जनतेची माफी मागावी, अशी मागणी विविध सामाजिक संघटनांनी निवेदनातून केली आहे. निवेदन देतांना सत्यशोधक महिला प्रबोधिनी, समता परिषद, संभाजी ब्रिगेड, वीर अशोक सम्राट संघटना, युवा सोशल फोरम आदी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी डॉ. नरेंद्र दाभोळकर, अॅड. गोविंद पानसरे यांच्या मारेकरांना त्वरित अटक करावी, अशीही मागणी करण्यात आली. याबाबत राष्ट्रपती रामनाथ गोविंद यांनाही निवेदन पाठविण्यात आले. तसेच समुद्रपूर येथेही या घटनेच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाºयांनी सभा घेऊन साधवी प्रज्ञा सिंग यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला. यावेळी नगर पंचायतीचे गटनेते मधुकर कामडी, नगरसेवक आशिष अंड्रस्कर, राहुल लोहकरे, देवानंद देवढे, किशोर आस्कर, बंडू शेंडे, महेंद्र शिरोडे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते. मेहेर बाबा ग्रामीण पतसंस्थेत निषेध सभा घेण्यात आली. यावेळी ज्येष्ठ काँग्रेस नेते सय्यद शफात अहमद, आनंदराव थुटे, मनोहर सायंकार आदी उपस्थित होते.