'पीएम' उद्या वर्ध्यात; शहरात सुरक्षा व्यवस्था तैनात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 03:21 PM2024-09-19T15:21:45+5:302024-09-19T15:23:54+5:30

जड वाहनांना शहरात असणार प्रवेशबंदी : वाहतुकीच्या मार्गातही केलाय बदल, शहरातील मैदानांवर वाहनतळ निश्चित

'PM' in Wardha tomorrow; Security has been deployed in the city | 'पीएम' उद्या वर्ध्यात; शहरात सुरक्षा व्यवस्था तैनात

'PM' in Wardha tomorrow; Security has been deployed in the city

लोकमत न्यूज नेटवर्क 
वर्धा :
केंद्र शासनाच्या पी. एम. विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत २० सप्टेंबरला स्वावलंबी मैदानात होणार आहे. त्याकरिता शहरात तगड़ी सुरक्षा व्यवस्था राहणार असून, शहरातील वाहतुकीच्या मार्गातही बदल करण्यात आला आहे. तसेच वाहनतळांचीही निश्चिती करण्यात आली आहे, याबाबत नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांनी केले आहे.


या कार्यक्रमास जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील नागरिक मोठ्या प्रमाणावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे २० सप्टेंबर रोजी सकाळी ६:०० ते रात्री ९:०० वाजेपर्यंत वाहतूक व रहदारीचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अचाधित राहावी, म्हणून सभास्थळाकडे जाणारा रहदारीचा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी तसेच पार्किंगस्थळाकडे जाणारा मार्ग कार्यक्रमाकरिता येणाऱ्या वाहनांव्यतिरिक्त इतर सर्व प्रकारच्या वाहनांकरिता रहदारी मार्गात बदल करण्यात आला आहे. जड वाहनांना शहरामध्ये प्रवेशबंदी केली आहे. रुग्णवाहिका, अग्निशमन वाहने व अतिमहत्वाच्या सेवा देणाऱ्या वाहनांना यामधून सूट देण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षकांनी दिली. 


सभेकरिता शहरातील बाहन पार्किया स्थळे 
स्वावलंबी डीएड कॉलेज मैदान व जगजीवन राम शाळेसमोरील मैदान, सर्कस ग्राऊंड रामनगर व शितला माता ग्राउंड येथे व्हीआयपी यांच्या वाहना करिता पार्किंग, जे. बी. सायन्स कॉलेज मैदान, इदगाह मैदान, कोचर महान गणे- शनगर, यशवंत जिनिंग ग्राउंड, मॉडेल हायस्कूल ग्राउंड शिवनगर येथे बसेस व ट्रॅव्हल्सकरिता पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सिदी (मेघे) ग्रामपंचायत ग्राउंडवर चारचाकी वाहना- करिता, अग्निहोत्री इंजिनिअरिंग कॉलेज, रामनगर येथे दुचाकी वाहनासाठी, संत तुकडोजी शाळा मैदान व पोलिस स्टेशन, रामनगर मैदान येथे पोलिस वाहनां करिता, न्यू इंग्लिश शाळा मैदान व केसरीमल कन्या शाळा मैदान वैथे शासकीय अधिकारी, कर्मचारी व इतर नागरिक यांच्या चारचाकी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.


वाहतुकीकरिता हे मार्ग असणार बंद 
सेवाग्राम चौक ते गांधी पुतळा 

शासकीय रेस्ट हाऊस, आरती चौक, धुनीवाला मठ, न्यू आर्टस कॉलेज, आर्वी नाका, पावडे चौककडून येणाऱ्या वाहतुकीस मज्जाव केला आहे. 

जुनापाणी चौक ते आर्वी नाका 
संचलर रोडमार्गे पावडे चौक येणाऱ्याा वाहतुकीस मज्जाव, स्वावलंबी मैदान (सभास्थळ), संत तुकडोजी मैदान (हेलीपॅड) सभोवताली २०० मीटरपर्यंत येणाच्या सर्व मार्गावर मज्जाव करण्यात आला आहे. बजाज चौक, शास्त्री चौक, बॅचलर रोड मार्गे स्वावलंबी मैदानाकडे येणारे मार्ग, स्वावलंबी मैदान, संत तुकडोजी महाराज मैदान सभोवताली २०० मीटरपर्यंत व आर्थी नाका ते शास्त्री चौकापर्यंत बॅचलर रोड नो पार्किंग झोन व नो हॉकर्स झोन घोषित करण्यात आला आहे.


या मार्गात बदल 
हिंगणघाट, समुद्रपूर या परिस रातील वाहतूक जाम चौरस्ता मार्गे हिंगणघाट, धोतरा, वायगाव चौरस्ता, सेलू काटे, बोरगावमार्गे वर्धा येथे येईल. शेडगाव फाटामार्गे येणारी वाहतूक सेवाग्राम चौक, बापू कुटी, नांदोरा, मांडवगड टी पाँडेट, आष्ठा, भुगाव. सेलू काटे रोड, बौरगाचमार्गे वर्धेकडे येईल, तसेच कारंजा, आष्टी, सेलू परिसरातून येणारी वाहतूक साटोडा टी पॉइंट, कारला टी पॉइंट, जुनापाणी चौक उड्डाणपूल, हिंदी विश्वविद्यालय उड्डाणपूल, शांतीनगर उहाणपूल, नागठाणा टी पछींट, सावंगी टी पॉइंट, देवळी नाका दयालनगर, कृषी उत्पन्न बाजार समिती यामार्गे वर्धा शहराकडे येतील. 


'नो फ्लाय झोन' घोषित 

  • पी. एम. विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त २० सप्टेंबर रोजी स्वावलंबी मैदान सभास्थळ व सर्व हेलीपॅडच्या सभोवताली दोन किलोमीटर परिसरात ड्रोन अथवा तत्सम हवाई साधने, पैराग्लायडर, पॅरामोटर्स, हैंडग्लायर्डर्स आदींचा वापर करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई आदेश लागू केला आहे. 
  • स्वावलंबी मैदान येथे आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधानांची उपस्थिती राहणार आहे. त्यामुळे सभास्थळ आणि हेलीपेंड परिसर नो फ्लाय झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. मनाई आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी राहुल कडींले यांनी दिला आहे.

Web Title: 'PM' in Wardha tomorrow; Security has been deployed in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.