विहिरीत टाकले विषारी द्रव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 12:32 PM2017-11-01T12:32:23+5:302017-11-01T12:35:52+5:30

गावातील पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीत कुणीतरी अज्ञात इसमाने टाकलेल्या विषारी द्रव्यामुळे मासोळ्यांचा मृत्यू झाला. आजनडोह येथे हा प्रकार उघड झाल्याने पाणी पुरवठा करणाऱ्याने नळाद्वारे पाणी सोडले नसल्याने मोठा अनर्थ टळला

Poisonous liquid mix in water | विहिरीत टाकले विषारी द्रव्य

विहिरीत टाकले विषारी द्रव्य

googlenewsNext
ठळक मुद्देनागरिकांत दहशत मासोळ्यांचा मृत्यू झाल्याने घटना उघड

आॅनलाईन लोकमत
वर्धा : गावातील पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीत कुणीतरी अज्ञात इसमाने टाकलेल्या विषारी द्रव्यामुळे मासोळ्यांचा मृत्यू झाला. आजनडोह येथे हा प्रकार उघड झाल्याने पाणी पुरवठा करणाऱ्याने नळाद्वारे पाणी सोडले नसल्याने मोठा अनर्थ टळला; मात्र या प्रकारामुळे गावकऱ्यांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याकडे तातडीने लक्ष देत पाण्याचे निर्जंतुकीकरण करून नागरिकांची पाण्याची समस्या मार्गी लावावी अशी मागणी होत आहे.
नळाला येणाऱ्या पाण्याची समस्या निर्माण झाल्याने महिलांना पाण्याकरिता भटकंती करावी लागत आहे. महिलांना विहिरीवरून किंवा मिळेल तेथून पाणी डोक्यावरून आणावे लागत आहे. त्यामुळे महिलांना या सणासुदीच्या दिवसात पाणी आंघोळी, स्वयंपाक या गोष्टीचा विचार करावा लागत असून याकडे तातडीने लक्ष देवून पाणी पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करावा व पाण्याचे परिक्षण करावे, अशी मागणी सर्वत्र होत आहे.
येथील नळयोजनेची विहीर गावापासून अर्ध्या किलोमिटर अंतरावर नदीलगत आहे. या विहिरीवरून गावाला पाणीपुरवठा होतो. या विहिरीवरून पाणी सोडण्याचे काम गुणवंता वाढवे नामक व्यक्ती काम करीत आहे. रोज सकाळी विहिरीवर जात व्यवस्थित पाणी सोडण्याचे काम सुरू होते. तो नित्याप्रमाणे सकाळी विहिरीवर पाणी सोडण्याकरिता गेला असता पाण्यावर मासोळ्या, बेडूक मृतावस्थेत तरंगताना दिसल्या. त्यामुळे त्याने पाणी न सोडता संबंधित सरपंच व उपसरपंचांना प्रकाराची माहिती देताच त्याने पाणी सोडण्यास मनाई केली.
नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होणार नाही याची दक्षता घेण्याकरिता विहिरीतील पाण्याचा उपसा करण्यात आला. या प्रकरणाची दखल घेत सचिव देशमुख, सरपंच व उपसरपंचांनी कारंजा पोलिसात सदर प्रकाराची तक्रार दाखल केली आहे. पाण्याची तपासणी करण्याकरिता आरोग्य निरीक्षकांना पाचारण करून नमुने दिलेले आहेत.

पाणी सोडणाऱ्याने विहिरीत न बघताच पाणी सोडले असते तर त्या गावात आज लहानमुले, माणसांना काय झाले असते हे सांगणे कठीणच आहे. असे हे कृत्य करणाऱ्याला काय म्हणावे हे अवघड आहे. तरी गावकऱ्यांनी यापुढे सर्तकता बाळगत ग्रामपंचायतला सहकार्य करावे.
- एस.आर. देशमुख, सचिव ग्रामपंचायत, कन्नमवारग्राम

Web Title: Poisonous liquid mix in water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.