निम्न वर्धा प्रकल्पाच्या कामाची पोलखोल

By admin | Published: May 16, 2017 01:12 AM2017-05-16T01:12:03+5:302017-05-16T01:12:03+5:30

निम्न वर्धा प्रकल्पावर आतापर्यंत २०८३.६३ कोटी खर्च झाले. अधिकाधिक मुख्य कालव्याचे काम पूर्ण होवून ....

Polar work for the following Wardha project | निम्न वर्धा प्रकल्पाच्या कामाची पोलखोल

निम्न वर्धा प्रकल्पाच्या कामाची पोलखोल

Next

जनमंचची सिंचन शोधयात्रा : २०८३.६३ कोटी खर्चूनही शेतकऱ्यांना लाभ नाही
फनिन्द्र रघाटाटे। लोकमत न्यूज नेटवर्क
रोहणा : निम्न वर्धा प्रकल्पावर आतापर्यंत २०८३.६३ कोटी खर्च झाले. अधिकाधिक मुख्य कालव्याचे काम पूर्ण होवून २०१७ अखेर २४६७४ हेक्टर शेतजमिनीत सिंचन क्षमता निर्माण झाल्याचे विभागाकडून सांगण्यात आले. ही संपूर्ण माहिती खोटी असल्याचे जनमंचच्यावतीने रविवारी आयोजित सिंचन शोध मोहिमेत पुढे आले. या मोहीम राज्य जनमंचचे बाबुजी अणे, आर. के. समितीचे वेद व भारतीय किसान संस्थेने आयोजित केली होती. यामुळे प्रकल्पावरील अभियंत्यांनी कागदोपत्री सादर केलेल्या कामाची शेतकऱ्यांसमोर पोलखोल झाली.
सिंचन शोधयात्रेच्या निमित्ताने प्रारंभी धनोडी विश्राम गृहावर अधिकारी, जनमंचचे पदाधिकारी परिसरातील शेतकऱ्यांची बैठक झाली. त्या सभेत कॅनलचे कार्यकारी अभियंता डी.जी. रब्बेवार, मायनरचे उपविभागीय अभियंता नरेंद्र निमजे, कार्यकारी अभियंता मंडवार यांनी प्रकल्पाची संपूर्ण माहिती उपस्थितांना दिली. त्यानुसार सदर प्रकल्पाची प्रथम प्रशासकीय मानयता ९ जानेवारी १९८१ रोजी मिळाली असून त्यावेळी या प्रकल्पाचा खर्च फक्त ४८.०८५ कोटी एवढा होता. प्रकल्पाचे काम निर्धारित वेळेत पूर्ण न झाल्याने सदर प्रकल्पाच्या कामाला १० जानेवारी २००० रोजी ४४४.५२१ कोटीच्या खर्चाची सुधारित प्रथम प्रशासकीय मान्यता २९ आॅगस्ट २००६ रोजी ९५०.७ कोटी खर्चाला द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता असे करीत पाच वेळा सुधारित प्रशासकीय मान्यता मिळारली. यानंतर आता सन २०१६-१७ मध्ये प्रकल्पाची किंमत ३६१५.२९ कोटी झाली आहे. सदर प्रकल्पावर मार्च २०१७ अखेर २०८३.९३ कोटी खर्च झाल्याची माहिती दिली. या खर्चातून ४४.४२५ किलोमिटर लांबीचा मुरूम टाकण्याचे संपूर्ण काम झाले. ६१.३० कि़मी.चे शाखा कालवे (मायनर) झाल्याचेही सांगितले.
या कामामुळे आर्वी तालुक्यातील १,२२१ हेक्टर, देवळी तालुक्यातील ३२,०३५ हेक्टर, वर्धा तालुक्यातील ११,२७७ हेक्टर व हिंगणघाट तालुक्यातील ८,००६ हेक्टर अशी एकूण ५२,५३९ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार असल्याचे सांगितले. या प्रकल्पावर सन २०११-१२ च्या रबी हंगामापासून प्रत्यक्ष सिंचनास सुरुवात करण्यात आली असून आजमितीस २१,५५२ हेक्टर सिंचन करणे शक्य झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती किती खरी आहे, याचा प्रत्यक्ष पडताळा घेण्यासाठी जनमंचचे व इतर संस्थेचे पदाधिकारी, आदिवासी, शेतकरी यांनी प्रकल्पाचा मुख्य कालवा, मायनर, पाटचऱ्या झालेले सिंचन, धरणाच्या भिंतीमुळे त्या भागात निर्माण झालेल्या समस्या यांची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणी अंती मुख्य कालवाच्या ४७५ मीटर लांबीला लायनिंग केलेले नसल्याचे दिसून आले. परिणामी पाणी पाझरत आहे. मायनरची अवस्था अत्यंत दयनिय असून सर्व कामे १० वर्षापूर्वी झाल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी त्यांच्या किनारी (बँक) भूईसपाट झाल्या आहेत. मारयनरला उतार नसल्याने पाणी पुढे सरकण्याऐवजी जागोजागी फुटून परिसरातील अनेक शेतात साचत असल्याचे दिसून आले.
वडगाव (पांडे) या गावपरिसरात तर उपकालव्यांनी आलेले पाणी रस्त्यावर साचत असल्याने गावातील शेतकऱ्यांना दळणवळणाचा प्रश्न निर्माण होत असल्याचे शेतकरी रमेश चिखले यांनी सांगितले. या पाण्यामुळे शेतीचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. या दौऱ्यात कॅनलची वस्तूस्थिती लक्षात आली तर शेतकऱ्यांनी सदर पाण्यामुळे फायदा कमी अन् नुकसान अधिक, अशी व्यथा व्यक्त केली. या कालव्यातून सोडलेले ६० टक्के पाणी वाया जात असून केवळ ४० टक्के पाणी सिंचनासाठी कामी येते. या प्रत्यक्ष पाहणी दरम्यान निर्माण झालेल्या प्रश्नावर अधिकारी आता दोन वर्षात उपकालवे स्वच्छ करू, पाटचऱ्या काठ व उर्वरित सर्व कामे करू असे थातूरमातूर उत्तरे देत होते. या मोहिमेत परिसरातील शेतकऱ्यांसह जनमंचचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Polar work for the following Wardha project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.