चालानमध्येही पोलिसांची मांडवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 12:49 AM2017-09-04T00:49:00+5:302017-09-04T00:49:22+5:30
शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याकरिता वाहतूक पोलीस विभागाच्यावतीने विविध उपाययोजना आखण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याकरिता वाहतूक पोलीस विभागाच्यावतीने विविध उपाययोजना आखण्यात येत आहे. या उपाययोजनांना त्यांचेच कर्मचारी हरताळ फासत असल्याचे दिसते. वाहतूक नियमांचे उल्लंघण करणाºयांना चालान देतानाही त्यांच्याकडून मांडवलीची भाषा बोलली जात आहे. यात आपला खिसा भरावा याकरिता न्यायालयात सादर करण्यात येणाºया चालानवर या कर्मचाºयांकडून दंडाची रक्कमही लिहिली जात नसल्याचा प्रकार वर्धेत घडला आहे.
शहरातील दोन रस्ते वन-वे करण्यात आले आहेत. याची माहिती नसणारा एक विद्यार्थी या रस्त्याने गेला. येथे नियमांचे उल्लंघण होताच उभ्या असलेल्या वाहतूक पोलिसांकडून त्याला अडवून दंड देण्याबाबात प्रक्रीया सुरू झाली. येथे विद्यार्थ्याकडे रक्कम नसल्याने त्याने पैसे नसल्याचा पाढा वाचला. यावेळी उपस्थित वाहतूक पोलिसाने त्याला पहिले ५०० रुपये दंड भरावा लागेल, असे सांगितले. आपल्याकडे सध्या काही रक्कम नाही, असे म्हणताच सदर कर्मचारी ३०० रुपये म्हणत २०० रुपये भरा, असे म्हणू लागला. यावरही त्या विद्यार्थ्याने आपल्याकडे काहीच रक्कम नाही, चालन द्या मी कार्यालयात येवून दंड भरतो, असे म्हटले.
यावर सदर कर्मचाºयाने त्या विद्यार्थ्याच्या हाती चालान दिले. तर अनामत म्हणून त्याचा वाहन चालविणाºयाचा परवाना जप्त केला. या विद्यार्थ्याने घरी आल्यावर त्या चालानची तपासणी केली असता त्यात दंडाच्या रकमेचा उल्लेखच नसल्याचे समोर आले. यामुळे सदर युवक अवाक् झाला.
वाहतूक पोलिसांकडून शहरात सुरू असलेल्या खुलेआम लुटीची चर्चा सर्वत्र असताना समोर आलेला हा प्रकार त्याला दुजोरा देणाराच ठरला आहे. या पोलिसांकडून होत असलेली वसुली कधी आड मार्गाने होत होती, तर आता कायद्याने दिलेल्या चालानच्या माध्यमातूनच हा प्रकार सुरू झाल्याचे वर्धेत दिसत आहे. चालकाकडून ५०० रुपये घ्यायचे आणि शासनाच्या तिजोरीत २०० रुपये भरायचे, असा प्रकार यातून होत असल्याचा संशय बळावत आहे.
कायद्यानुसार दंडाचा उल्लेख अनिवार्य
वाहतूक नियमांचे उल्लंघण करणाºयांना वाहतूक पोलीस कर्मचाºयांकडून चालान देण्यात येते. या चालानावर तोडलेल्या नियमाचा आणि त्याच्या दंडाचा स्पष्ट उल्लेख असणे कायद्याने बंधनकारक आहे. येथे मात्र तसे झाले नाही. चालानवर कारणाचा उल्लेख आहे; मात्र दंडाचा कुठलाही उल्लेख नाही. यामुळे वाहतूक पोलिसांकडून दररोज होत असलेल्या कारवाईवर संशय निर्माण होत आहे.