गुन्हा दाखल होण्यापूर्वीच केली पोलिसांनी अटक
By admin | Published: March 12, 2016 02:32 AM2016-03-12T02:32:16+5:302016-03-12T02:32:16+5:30
दुसरी गंभीर बाब म्हणजे, त्या महिलेच्या विरोधात खंडणी मागितल्या प्रकरणी सकाळी ११.३० वाजता रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
वर्धा : दुसरी गंभीर बाब म्हणजे, त्या महिलेच्या विरोधात खंडणी मागितल्या प्रकरणी सकाळी ११.३० वाजता रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र सायंकाळी ७ वाजता पोलीस निरीक्षक विजय मगर यांनी एफआयआरवर स्वाक्षरी करण्याच्या नावावर पोलीस ठाण्यात बोलाविले. आणि तिथेच ७.१५ वाजता सेवाग्राम पोलिसांनी आपल्याला अटक केली. वास्तविक, त्या महिलेने आपल्याविरुद्ध सायंकाळी ७ वाजता तक्रार दिल्यानंतर रात्री ८.३० वाजता सेवाग्राम पोलिसांनी गुन्हा नोंद केला. आणि अटक ९.५० वाजता दाखविली. मग एफआयआर दाखल होण्यापूर्वीच आपल्याला अटक करण्यामागचे कारण काय. आपण सराईत गुन्हेगार असतो, तर हे समजण्यासारखे होते, असा आरोपही भेंडे यांनी केला.
एमसीआरनंतर कारागृहात रवानगी झाली. रक्तदाब वाढताच सामान्य रुग्णालयात नेले. तेथे एका राजकीय नेत्याचा फोन आला आणि डॉक्टरांची सुटी करण्यासाठी धडपड सुरु झाली. रक्तदाब वाढला होता. सेवाग्राम येथेही त्या राजकीय नेत्यांच्या फोनवरून रात्री १२.३० वाजता सुटी देऊन कारागृहात हलविण्यात आले. दोन दिवसांनी सामान्य रुग्णालयातून गोळ्या देऊन परत पाठविले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी राजकीय दबाब आणत असल्याचे सांगितले, असा आरोपही भेंंडे यांनी यावेळी केला. ज्या महिलेने आरोप केला तिने दुसऱ्याच दिवशी आपली तक्रार परत घेण्यासाठी अर्ज केला. न्यायालयात अॅफिडेव्हीट लिहून दिले. मात्र काही राजकीय मंडळींनी कोणतीही संधी दवडली नाही. यामुळे डोक्यात आत्महत्येचे विचार येत होते. कुटुंबीय त्रस्त होते. अशातच मुलीने एक चिठ्ठी कारागृहात पाठविली. त्या चिठ्ठीतून तिने जगण्याचे बळ दिले, आणि आत्महत्येचा विचार सोडून दिला, हा भावनिक प्रसंगही भेंडेंनी सांगितला. जि. प. सदस्य मंदा चौधरी, बंडू झोटिंग, सविता भालकर, प्रमोद वर्भे, प्रविण काटकर, अतुल तिमांडे, प्रवीण पाल, भास्कर वर्भे, प्रिया उगेमुगे, हेमंत मंगरूळकर आणि जयवंत साव आदी उपस्थित होते.(जिल्हा प्रतिनिधी)