वर्ध्यात कपाशीच्या बनावटी बियाणे विक्रीचा पोलिसांनी केला पर्दाफाश
By चैतन्य जोशी | Published: June 13, 2023 08:13 AM2023-06-13T08:13:06+5:302023-06-13T08:14:02+5:30
गुजरात येथून वर्ध्यात पोत्यात कपाशीची बियाणं आणून रिपॅकिंग करणाऱ्यांचा पोलिसांनी पर्दाफाश केला.
वर्धा : गुजरात येथून वर्ध्यात पोत्यात कपाशीची बियाणं आणून रिपॅकिंग करणाऱ्यांचा पोलिसांनी पर्दाफाश केला. रिपॅकिंग करून ही बियाणं शेतकऱ्यांना विकली जात असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये पोलिसांनी २९७ पोते बियाणे जप्त केली असून एक ट्रकही ताब्यात घेतला आहे.
पोलीस, कृषी आणि महसूल विभागाचे अधिकारी रात्रीपासून घटनास्थळावर दाखल झाले होते. मध्यरात्री पोलिसांनी केली कारवाई केली असून अद्यापही कारवाई सुरु असल्याची माहिती समोर आलीये. यामध्ये तब्बल 1 कोटी 51 लाख 82 हजारच्या जवळपास मुद्देमाल जप्त करण्यात आल आहे. या प्रकरणी सेवाग्राम पोलिसांनी सहा आरोपीनां ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली.
चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि नागपूर येथे ही बोगस बियाणे पाठवली जातं होती. गुजरात येथून आलेल्या बियाणाच्या पोत्यातून छोट्या पाकिटात रिपॅकिंग करून ही बियाणे विकली जात होती. याशिवाय या बियाणांच्या पाकिटांवर विविध नावंही लिहिली जात होती. पोलिसांनी घटनास्थळावरून 3 लाख 300 रुपयाची रक्कमही केली जप्त केली असून प्रशासनाकडून पंचनामा करत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सूरु आहे. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी माध्यरात्रीच दिली घटनास्थळी भेट दिली. तहसीलदार रमेश कोळपे, कृषी विभागाचे अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, सावंगी ठाणेदार धनाजी जळक हे घटनास्थळी पंचनामा करत आहे.