पोलिसांनी ७४ गावांमध्ये राबविली दारूबंदी मोहीम
By admin | Published: September 8, 2015 04:18 AM2015-09-08T04:18:08+5:302015-09-08T04:18:08+5:30
पुलगाव पोलीस ठाण्याच्यावतीने गत दोन महिन्यांपासून दारूबंदी मोहीम राबविली जात आहे. यात ठाण्यांतर्गत येणाऱ्या ७४
देवकांत चिचाटे ल्ल नाचणगाव
पुलगाव पोलीस ठाण्याच्यावतीने गत दोन महिन्यांपासून दारूबंदी मोहीम राबविली जात आहे. यात ठाण्यांतर्गत येणाऱ्या ७४ गावांत दारूविक्रेत्यांवर धाडी टाकून मुद्देमाल जप्त करण्यात आला. शिवाय गावठी दारूच्या भट्ट्याही उद्ध्वस्त करण्यात आल्या. यात दोन महिन्यांत सुमारे पाच ते आठ लाख रुपयांवर मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पुलगाव पोलीस ठाण्यात रूजू झालेले पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे यांनी दारूबंदी मोहिमच हाती घेतली आहे. पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात ७४ गावे समाविष्ट आहे. ५० किमीच्या परिसरात या ठाण्याची व्याप्ती आहे. यात काही संवेदनशील गावांचाही समावेश आहे. गावात महिलांना तसेच सामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेत ठाणेदारांनी दारूबंदीच्या दिशेने प्रभावी पाऊल उचलले आहे. दोन महिन्यांच्या कालावधीत दारूविक्रेत्यांविरूद्ध १५० च्या वर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात गावठी दारूचाच अधिक समावेश आहे. मोटरसायकलद्वारे होत असलेली अवैध दारूची वाहतूक नाकेबंदी करीत रोखण्यात आली. पुलगाव पोलिसांकडून कांदेगाव, चोंढी, डोरली, विरूळ (आ.), पिंपळगाव, कुरझडी (फोर्ट), लालबर्डी, इंझाळा, वायफड, कोळोणा, कवठा, शेंद्री, आगरगाव व दहेगाव आदी गावांमध्ये दारूभट्ट्यांवर धाडी टाकण्यात आल्या. यात भट्ट्या उद्ध्वस्त करीत ड्रम उद्ध्वस्त करण्यात आल्या. अनेक ठिकाणी जेसीबीचा वापर करीत जमिनीमध्ये गाडलेले ड्रम खणून उद्ध्वस्त केले. घटनास्थळीच पंचनामा केला गेला. दारूबंदीबाबत गावात ग्रामसभेच्या माध्यमातून परिवर्तनात्मक बदलाची माहिती देण्यात येत आहे. या मोहिमेत ठाणेदार शिरतोडे यांच्या मार्गदर्शनात पी.एस.आय. हाके, शेख, खेडेकर, मुलबैले, लसुंते आदींनी सहभाग घेतला.
दारूबंदी महिला मंडळांचेही मिळतेय सहकार्य
४पुलगाव पोलीस ठाण्याच्यावतीने शहरासह ग्रामीण भागात दारूबंदीला मूर्त रूप यावे म्हणून प्रयत्न केले जात आहे. दारूबंदी महिला मंडळांच्या मागणीवरून दारूविक्रेत्यांविरूद्धच्या धाडसत्राला वेग देण्यात आला आहे. या कार्यात दारूबंदी महिला मंडळांचेही सहकार्य लाभत आहे. यामुळेच ग्रामीण भागातील दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. शिवाय अमरावती जिल्हा लागून असल्याने दारूविक्री बंद होऊ शकणारी नसली तरी त्यावर काही प्रमाणात आळा घालणे शक्य आहे. यासाठी ठाणेदार शिरतोडे व पोलीस कर्मचाऱ्यांकडून दारूबंदी मोहीम राबविली जात आहे. दोन महिन्यांत १५० च्या वर व्रिकेत्यांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून लाखो रुपयांचा मुद्देमालही जप्त केला.
४पुलगाव पोलिसांनी कांदेगाव, चोंढी, डोरली, विरूळ, पिंपळगाव, कुरझडी फोर्ट, लालबर्डी, इंझाळा, वायफड, कोळोणा, कवठा, शेंद्री, आगरगाव, दहेगाव यासह परिसरातील अन्य गावांतही दारूविक्रेत्यांविरूद्ध धाडसत्र राबविले. या कारवाईमुळे दारूविक्रेत्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. शहरातील दारूविक्रेत्यांविरूद्धही पुलगाव पोलिसांकडून कारवाई करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.