‘पुलीस मे रिपोर्ट दी, तो जान से मार डालूंगा’, दोघांवर तलवारीने हल्ला करून जीवे मारण्याची धमकी
By चैतन्य जोशी | Updated: September 26, 2022 17:38 IST2022-09-26T17:35:59+5:302022-09-26T17:38:45+5:30
इतवारा बाजार परिसरातील घटना

‘पुलीस मे रिपोर्ट दी, तो जान से मार डालूंगा’, दोघांवर तलवारीने हल्ला करून जीवे मारण्याची धमकी
वर्धा : दुचाकीवरुन जाणाऱ्या दोन युवकांना रस्त्यात अडवून त्यांच्यावर तलवारीने वार करीत जखमी केले. तसेच पुलीस मे रिपोर्ट दी तो जान से मार डालूंगा असे म्हणत धमकी देत धुमाकूळ घातला. ही घटना इतवारा बाजार परिसरात घडली. याप्रकरणी २५ रोजी शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.
अनिकेत सदानंद काळे (२५) रा. पुलफैल हा शेख समीर अब्दु वजीर याच्या मालकीच्या दुचाकीवर बसून ट्रॅव्हल्स ऑफीसमध्ये तिकिट काढण्यासाठी गेला होता. तिकिटां काढून इतवारा बाजार परिसरातून जाणाऱ्या रस्त्याने घरी जात असतानाच गणेश पेंदोर हा हातात तलवार घेऊन दुचाकीच्या आडवा झाला. शिवीगाळ करुन ये रस्ते से जाना नही, असे म्हणत शेख वजीर याच्या पायावर तलवारीने वार केला. तसेच अनिकेत काळे याच्या हातावर वार करीत दोघांना जखमी केले. दोघांनीही जीव वाचविण्यासाठी दुचाकी तेथेच सोडून पळ काढला. याप्रकरणी अनिकेत काळे याने शहर पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गणेश पेंदोर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.