विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी ‘पोलीस काका, दिदी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2020 06:00 AM2020-01-26T06:00:00+5:302020-01-26T06:00:31+5:30

स्थानिक आशीर्वाद सभागृहात पोलिस विभागाच्या ‘पोलीस काका, पोलीस दिदी’ या उपक्रमाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. यावेळी या उपक्रमाचे फलक देण्यात आले. राज्यात महिला व मुलांवर होणारे वाढते अत्याचार, छेडखानीच्या घटना, शाळा महाविद्यालयात होणारे रॅगिंगचे प्रकार, व्यसनांचा विळखा आदी प्रकारांवर आळा बसविण्यासाठी हा उपक्रम पुणे पोलिसांच्या उपक्रमाच्या आधारावर वर्धा पोलीस विभागाकडून राबविण्यात येत आहे.

'Police uncle, sister' to protect students | विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी ‘पोलीस काका, दिदी’

विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी ‘पोलीस काका, दिदी’

Next
ठळक मुद्देसंडे अँकर । पोलीस विभागाचा उपक्रम : शाळांमध्ये असणार खाकीचा खडा पहारा

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महिलांसह मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना लक्षात घेता, शाळेतील विद्यार्थ्यांना संरक्षण देण्याकरिता पोलीस विभागाकडून ‘पोलीस काका, पोलीस दिदी’ हा नवा उपक्रम सुरू केला आहे. आता प्रत्येक शाळेत पोलिसांचा पहारा राहणार असून विद्यार्थ्यांना आपल्या तक्रारी यांच्याकडे करता येणार आहे. पोलिसांच्या या उपक्रमाचे पालकांकडून तसेच शाळेतील मुख्यध्यापक व शिक्षकांकडून स्वागत होत आहे.
स्थानिक आशीर्वाद सभागृहात पोलिस विभागाच्या ‘पोलीस काका, पोलीस दिदी’ या उपक्रमाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. यावेळी या उपक्रमाचे फलक देण्यात आले. राज्यात महिला व मुलांवर होणारे वाढते अत्याचार, छेडखानीच्या घटना, शाळा महाविद्यालयात होणारे रॅगिंगचे प्रकार, व्यसनांचा विळखा आदी प्रकारांवर आळा बसविण्यासाठी हा उपक्रम पुणे पोलिसांच्या उपक्रमाच्या आधारावर वर्धा पोलीस विभागाकडून राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील शाळांचा आढावा घेण्यात आला असून प्रत्येक शाळांकरीता एक पोलीस काका, पोलीस दीदी दररोज पहारा देणार आहेत. संबंधित पोलीस काका, दीदीचे नाव, मोबाईल क्रमांक असलेला फलक शाळेच्या नोटीस बोर्ड किंवा दर्शनीय भागात लावण्यात येणार आहे. हे पोलीस काका आणि दिदी शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक आदींची दररोज भेट घेतील. तसेच महिन्यातून एक किंवा दोनदा जनजागृती कार्यक्रम घेतील. विद्यार्थ्यांना तक्रारी देण्यास अडचण जात असेल, किंवा त्या पुढे येण्यास तयार नसतील, अशांच्या तक्रारी नोंदविण्यात येणार आहे.
या उपक्रमामुळे महिला व मुलींवरील होणाºया अन्यायाच्या घटनांमध्ये काही प्रमाणात घट होईल, अशी अपेक्षा पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी कार्यक्रमादरम्यान व्यक्त केली. कार्यक्रमाला अपर पोलीस अधीक्षक नीलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी पीयुष जगताप, भीमराव टेळे, तृप्ती जाधव पोलीस निरीक्षक नीलेश ब्राम्हणे, कांचन पांडे, योगेश पारधी, सिंगणजुडे, धनाजी जळक, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक चौधरी यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक सहाय्यक पोलीस निरीक्षक मेघाली गावंडे यांनी केले. यावेळी विविध शाळेतील विद्यार्थी व शिक्षकही उपस्थित होते.

नागरिकांच्या सहकार्याची गरज
पोलीस महासंचालकांच्या संकल्पनेनुसार वर्धा जिल्ह्यात ‘पोलीस काका, दिदी’ ही संकल्पना राबविण्यात येत असून महिला व मुलांना निर्भय वातावरण देण्याचा पोलीस विभागाचा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक नीलेश मोरे यांनी केले.

Web Title: 'Police uncle, sister' to protect students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस