वर्धा जिल्ह्यात अवैध दारू वाहतुकीच्या वाहनाने पोलिस गाडीला उडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 04:04 PM2018-09-08T16:04:58+5:302018-09-08T16:06:49+5:30
समुद्रपुर तालुक्यात अवैध दारू वाहतूक होत असल्याच्या मिळालेल्या माहितीवरून समुद्रपूर शेंडगाव रोडवर सापळा रचून नाकेबंदी केल्यानंतर दारुची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाने पोलिसांची गाडी व अन्य एका वाहनास उडवून तीन जणांना जखमी केल्याची घटना शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: समुद्रपुर तालुक्यात अवैध दारू वाहतूक होत असल्याच्या मिळालेल्या माहितीवरून समुद्रपूर शेंडगाव रोडवर सापळा रचून नाकेबंदी केल्यानंतर दारुची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाने पोलिसांची गाडी व अन्य एका वाहनास उडवून तीन जणांना जखमी केल्याची घटना शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास घडली. या अपघातात ठाणेदार प्रवीण मुंडे हे गंभीर जखमी तर अन्य दोन शिपाई जखमी झाले आहेत.
पोळ््याच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात अवैध दारुची वाहतूक होणार असल्याची सूचना पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी संध्याकाळी ८ च्या सुमारास टाटा बोल्ड क्र एम एच ४९ एफ ०७०३ चा हवालदार अरविंद येनोकर यांनी पाठलाग सुरू केला. मात्र ही गाडी दुसºया मार्गे वळवण्यात आल्याने त्यांनी तशी माहिती ठाणेदार प्रवीण मुंडे यांना दिली. मुंडे हे पोलिसांच्या बोलेरो या गाडीने तसेच अन्य एका खाजगी वाहनात पोलीस उपनिरीक्षक मिलींद पारडकर यांच्यासह अन्य पोलीस निघाले. समुद्रपूर शेंडगाव रोडवरील कालव्याच्या पुढे रोडच्या दोन्ही बाजूने वाहने उभी करून पोलिस कर्मचारी जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांची तपासणी करीत होते. त्याचवेळी दारु वाहतुकीची गाडी त्यांना येताना दिसली. पोलिसांनी तिला हात दाखवून थांबण्याचा इशारा केला मात्र गाडीचालकाने वेग कमी न करता गाडी तशीच पोलिसांच्या वाहनावर नेली. पोलिसांच्या गाडीत बसलेले ठाणेदार प्रवीण मुंडे हे जबर जखमी झाले. त्यांच्या नाकाचा भाग फ्रॅक्चर झाला तर छातीच्या बरगड्यांनाही मोठा मार लागला आहे. अन्य पोलिस शिपाईही जखमी झाले. गाडीला धडक दिल्यानंतर गाडी चालकाने गाडी सोडून अंधारात पळ काढला. या गाडीतून दारूच्या ३० पेट्या जप्त करण्यात आल्या.
पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी भिमराव टेळे यांचे मार्गदर्शनात ठाणेदार प्रविण मुंडे पो. उपनिरिक्षक मिलिंद पारडकर पोलिस हवालदार अरविंद येनोरकर, उमेश हणखेडे चांगदेव बुरंगे , वैभव चरडे, अजय घुसे, स्वप्नील वाटकर, राजु जैयसिंगपुरे , विरु कांबळे विनायक गोंडे, इत्यादी करित आहे.
.