हृदयविकाराच्या झटक्याने पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 09:59 PM2017-12-26T21:59:40+5:302017-12-26T22:00:05+5:30

कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी राजकुमार भगत (५७) यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. ते पोलीस अधीक्षक कार्यालयातील बिनतारी संदेश विभागात वायरलेस इलेक्ट्रीशन म्हणून कार्यरत होते. ही घटना मंगळवारी दुपारी घडली.

A policeman dies after heart attack | हृदयविकाराच्या झटक्याने पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्य

हृदयविकाराच्या झटक्याने पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्य

Next
ठळक मुद्देकर्तव्यावर असताना आला झटका

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी राजकुमार भगत (५७) यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. ते पोलीस अधीक्षक कार्यालयातील बिनतारी संदेश विभागात वायरलेस इलेक्ट्रीशन म्हणून कार्यरत होते. ही घटना मंगळवारी दुपारी घडली.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनातील जबाबदारी पार पाडून राजकुमार भगत हे वर्धेत आले. त्यानंतर ते कर्तव्यावर रुजूही झाले. दरम्यान मंगळवारी कर्तव्य बजावत असताना त्यांना छातीत दुखायला लागले. त्यामुळे त्यांना तात्काळ सेवाग्राम येथील रुग्णालयात नेण्यात आले. तेथे तपासणीअंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. राजकुमार भगत यांनी नागपूर, गडचिरोली जिल्ह्यासह इतरही जिल्ह्यात उत्कृष्ट काम केल्याचे सांगण्यात येते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व बराच मोठा आप्त परिवार आहे. या घटनेने पुन्हा एकदा पोलीस विभागातील कर्मचारी कामाच्या तणावात असल्याचे समोर आले आहे. याकडे लक्ष देत कर्मचाºयांना मुभा देण्याची मागणी आहे.

Web Title: A policeman dies after heart attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस