धाम नदीवरील पूल खचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 11:40 PM2018-11-06T23:40:39+5:302018-11-06T23:41:39+5:30

खरांगणा (मोरांगणा) ते कारंजा-कांढळी मार्गावरील धाम नदीवर असलेल्या पाच दशकापूर्वीचा पुल अचानक खचला. ही घटना सोमवारच्या रात्री ११ वाजता दरम्यान घडल्याने मोठी जीवितहानी टळली. या मार्गावरील वाहतूक ही बांगडापूर मार्गाने वळविण्यात आली आहे.

The pool on Dham river collapsed | धाम नदीवरील पूल खचला

धाम नदीवरील पूल खचला

Next
ठळक मुद्देजीवितहानी टळली : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षितपणाचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्क
आकोली/ खरांगणा (मो.) : खरांगणा (मोरांगणा) ते कारंजा-कांढळी मार्गावरील धाम नदीवर असलेल्या पाच दशकापूर्वीचा पुल अचानक खचला. ही घटना सोमवारच्या रात्री ११ वाजता दरम्यान घडल्याने मोठी जीवितहानी टळली. या मार्गावरील वाहतूक ही बांगडापूर मार्गाने वळविण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुलाचे मुल्यांकन केले नसल्याने ही घटना घडल्याचे उघडकीस आले आहे.
धाम नदीवरील हा राज्य महामार्गावर असल्याने तो सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतो. या पुलाचे बांधकाम साधारणत: १९६४ मध्ये झाल्याचे सांगण्यात आले. या दरम्यान या पुलावरुन मोठ्या प्रमाणात जड वाहतूक झाली. हा मार्ग मध्यप्रदेशात जाण्यासाठी सोयीचा असल्याने या मार्गामुळे जवळपास १०० किलो मीटरचा फेरा वाचतो. या मार्गावर कोणताही टोलनाका नसल्याने ट्रक, कंटेनरची मोठी वर्दळ असते. या पुलाच्या देखभालीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने वारंवार दुर्लक्ष केल्याने अखेर सोमवारी रात्री या पुलाचा मधातील एक खांब खचल्याने पुलही तुटला. घटनेची माहिती मिळताच खरांगणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक संतोष शेगांवकर आपल्या कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी दाखल झाले.पोलीसांनी लगेच या मार्गावरील वाहतूक बंद करुन वर्धेकडे जाणारी वाहतूक बांगडापूर-माळेगाव-आकोली मार्गे वळविण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता भित्रे यांनीही घटनास्थळ गाठले. तसेच चंद्रपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता साखरवाडे आणि नागपुरातील अधिकारीही घटनास्थळाला भेट देणार असल्याचे उपस्थित अधिकाºयांनी सांगितले.

या पुलाची एक बाजू खचायला लागली होती. याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाला देऊनही दुर्लक्ष करण्यात आले. या पुलाचे आॅडिट होणे गरजेचे होते, पण ते केले गेले नाही.बांधकाम विभागाच्या दुर्लक्षीतपणामुळेच हा पुल खचला.
- राजू राठी, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष, मोरांगणा

महाकालीचे प्रसिद्ध देवस्थान या मार्गावर आहे. ज्यावेळी पुलाचे बांधकाम करण्यात आले त्यावेळी इतक्या मोठ्या प्रमाणात वाहतूक नव्हती. नंतरच्या काळात मध्यप्रदेशात जाण्यासाठी हा मार्ग सोयीचा ठरल्याने वाहतूक वाढली. लवकरात लवकर या पुलाची दुरुस्ती करुन मार्ग मोकळा करावा. त्यामुळे लोकांना लांब पल्ल्याने जाण्याचा त्रास सहन करावा लागणार नाही.
-नितीन अरबट, पंचायत समिती सदस्य

Web Title: The pool on Dham river collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :riverनदी