दारिद्र्यात जन्मलेला संजय भोगतोय अपंगत्वाच्या वेदना

By admin | Published: December 29, 2014 11:49 PM2014-12-29T23:49:43+5:302014-12-29T23:49:43+5:30

आर्थिक परिस्थितीने माणूस गरीब वा श्रीमंत असला तरी तो आपली परिस्थिती बदलू शकतो; पण शारीरिक अपंगत्व आले तर असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो. यातही हे अपंगत्व गरीब घरातील

Poor childbirth Sanjay bhogatoya pain of disability | दारिद्र्यात जन्मलेला संजय भोगतोय अपंगत्वाच्या वेदना

दारिद्र्यात जन्मलेला संजय भोगतोय अपंगत्वाच्या वेदना

Next

सचिन देवतळे - विरूळ (आ़)
आर्थिक परिस्थितीने माणूस गरीब वा श्रीमंत असला तरी तो आपली परिस्थिती बदलू शकतो; पण शारीरिक अपंगत्व आले तर असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो. यातही हे अपंगत्व गरीब घरातील व्यक्तीला आले तर त्याला उपचार करणेही कठीण जाते. विरूळ येथील संजय दाभाडे हा युवकही असाच गरीबीचा शाप आणि अपंगत्वाचे ओझे घेऊन उपचारासाठी पै-पै गोळा करीत असल्याचे दिसते़
अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या संजयची कहाणी विदारक आहे. संजय हा इतरांसारखाच सृदृढ व मेहनती तरूण होता. बारावीपर्यंत शिक्षण घेतलेला हा तरूण मेहनत करून आपले व आपल्या वृद्ध आई-वडिलांचे पोट भरत होता़ सततच्या आजारपणामुळे त्याच्या वृद्ध आई-वडिलांनी जगाचा निरोप घेतला. यानंतर तो बहिणीच्या साह्याने जीवन जगत असताना बहिणीचाही मृत्यू झाला़ यामुळे बहिणीच्या दोन लहान मुलींची जबाबदारी त्याच्यावर आली़ ही जबाबदारी तो पेलत असतानाच नियतीने त्याची क्रूर थट्टा केली.
संजय आजारी पडला आणि अपंगच झाला. त्याला आता उभे राहता येत नाही़ जमिनीवर घुसून त्याला पूढे जावे लागते़ शेजारील व्यक्ती त्याला उचलून इकडेचे तिकडे करतात़ जवळ होता तेवढा पैसा त्याने आपल्या आजारावर खर्च केला. शासनाच्या ६०० रुपयांवर तो दोन चिमुकल्यांसह जगत आहे़ यापूर्वी त्याच्यावर राजस्थान येथे शस्त्रक्रिया करण्यात आली़ पैसा खर्च झाला; पण अपंगत्व दूर झाले नाही. आता पुढील महिन्यात त्याच्यावर पुन्हा शस्त्रक्रिया आहे. यासाठी १० ते १५ हजार रुपयांची गरज आहे. पैशाची जुळवा-जुळव करण्यासाठी संजयची धडपड सुरू आहे.

Web Title: Poor childbirth Sanjay bhogatoya pain of disability

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.