आश्रमपुढे वाहनांच्या गर्दीमुळे अपघाताची शक्यता
By Admin | Published: December 30, 2014 11:40 PM2014-12-30T23:40:13+5:302014-12-30T23:40:13+5:30
येथील महात्मा गांधी आश्रम पाहण्यासाठी देश विदेशातील पर्यटकांसह शैक्षणिक सहलीही येथे येत असतात. यामुळे कुटीच्या मुख्य मार्गावर आणि प्रवेशद्वाराच्या आजुबाजूला वाहनांची गर्दी होते.
सेवाग्राम : येथील महात्मा गांधी आश्रम पाहण्यासाठी देश विदेशातील पर्यटकांसह शैक्षणिक सहलीही येथे येत असतात. यामुळे कुटीच्या मुख्य मार्गावर आणि प्रवेशद्वाराच्या आजुबाजूला वाहनांची गर्दी होते. या गर्दीमुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. वाहन चालक, मालक आणि पर्यटकांनी याची खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे. येथे वाहतूक पोलीस नियुक्तीची मागणी होत आहे.
आश्रम परिसराच्या पलिकडे यात्री निवास व गांधी चित्रप्रदर्शन आहे. यात्री निवासमध्ये नित्य कार्यक्रम सुरू असतात. आश्रम पाहून झाल्यानंतर विद्यार्थी व दर्शनार्थी रस्त्याच्या पलिकडे असलेले गांधी चित्र प्रदर्शन पाहण्याकरिता जातात. आश्रम मार्गावरील वर्दळ आता नियंत्रणापलिकडे गेली आहे. बेधडक धूम स्टाईलने वाहन चालविणे जणू काही क्रेझ बनली की काय, असे चित्र येथे दिसत आहे.(वार्ताहर)