वीज चोरी; महावितरणला राज्यात १० कोटींचा फटका

By Admin | Published: June 26, 2014 11:27 PM2014-06-26T23:27:31+5:302014-06-26T23:27:31+5:30

महावितरणने राज्यभरात मे महिन्यात १ हजारांवी वीजचोऱ्या पकडल्या़ वीजचोरीने महावितरणला राज्यात तब्बल १० कोटी २८ लाख ५८ हजारांचा फटका बसला़ यात नागपूर परिमंडळातील ११८ वीजचोऱ्यांचा समावेश आहे.

Power theft; MSEDCL crashes 10 crores in state | वीज चोरी; महावितरणला राज्यात १० कोटींचा फटका

वीज चोरी; महावितरणला राज्यात १० कोटींचा फटका

googlenewsNext

वर्धा : महावितरणने राज्यभरात मे महिन्यात १ हजारांवी वीजचोऱ्या पकडल्या़ वीजचोरीने महावितरणला राज्यात तब्बल १० कोटी २८ लाख ५८ हजारांचा फटका बसला़ यात नागपूर परिमंडळातील ११८ वीजचोऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणातील सर्व वीजचोरांवर कारवाई सुरू आहे.
महावितरणच्या भरारी पथकांनी नागपूर परिमंडळासह राज्यभरात वीजचोरी विरूद्ध मे महिन्यात मोहीम राबविली. यात नागपूर परिमंडळात चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, वर्धा व गोंदिया या पाच जिल्ह्यात कलम १३५ अंतर्गत ११८ तर १२६ अंतर्गत एकूण ३ व हुक टाकून वीजचोरी करणे, वीज वापराच्या तुलनेत कमी बिल येत असताना तसे सुचित न करणे, मीटर संथ असणे, मीटर बायपास करून वीज वापरणे अशा कारणांमुळे दोषी आढळणाऱ्या ६५ वीजचोऱ्या अशा १८६ वीजचोऱ्या उघडकीस आणल्या़ यात १ लाख ७१ हजार १९६ युनिटची वीजचोरी झाल्याचे उघडकीस आले. या वीजचोऱ्यांमुळे केवळ चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, वर्धा व गोंदिया जिल्ह्यात महावितरणला ९१ लाख ६७ हजारांचा फटका बसला. महावितरणने यात वीजचोरांवर कारवाईचा बडगाही उगारला आहे. या मोहिमेत सिंगल व थ्री-फेज पुरवठा असलेल्या घरगुती, व्यापारी, औद्योगिक अशा ४६० ग्राहकांची तपासणी झाली़ यातून १८६ ग्राहकांकडे वीजचोरी वा गैरवापर होत असल्याचे दिसून आले़ महावितरण दक्षता, अंमल-बजावणी व सुरक्षा कक्ष नागपूरचे उपकार्यकारी संचालक सुमीत कुमार यांच्या मार्गदर्शनात सर्व उपकार्यकारी अभियंता श्रीगडीवार, जी.सी. जयस्वाल, ए.डी. उईके, एस.व्ही. वाशिनकर, व्ही.एम. खाडे यांनी सर्व वीजचोऱ्या उघडकीस आणल्या.
सर्वांवर वीज चोरीच्या रकमेशिवाय तडजोड रकमेच्या वा वीजचोरीच्या दंडाच्या रकमेपोटी किलोवॅटप्रमाणे वीज वापराच्या तुलनेत ४ ते २५ हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात आला. वीजचोरी रोखण्यासाठी वीज कंपनीने ही मोहीम राबविली असून ग्राहकांचे सहकार्य गरजेचे आहे़(कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Power theft; MSEDCL crashes 10 crores in state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.