प्रहारचा पं.स. कार्यालयावर हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 10:36 PM2017-12-12T22:36:31+5:302017-12-12T22:36:50+5:30

दिव्यांग बांधवांसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी प्रहारच्यावतीने आर्वी पं.स. कार्यालय गाठून हल्लाबोल आंदोलन केले.

Prahar Attack on the P.S. office | प्रहारचा पं.स. कार्यालयावर हल्लाबोल

प्रहारचा पं.स. कार्यालयावर हल्लाबोल

Next
ठळक मुद्देविविध मागण्या रेटल्या : कर्मचाऱ्यांची उडाली तारांबळ

आॅनलाईन लोकमत
आर्वी : दिव्यांग बांधवांसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी प्रहारच्यावतीने आर्वी पं.स. कार्यालय गाठून हल्लाबोल आंदोलन केले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन आंदोलनकर्त्यांनी पं.स. उपसभापती धमेंद्र राऊत यांना सादर केले. सदर आंदोलनामुळे पं.स. कार्यालयातील कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली होती.
शेतकºयांना शासनाच्यावतीने विविध योजनांच्या माध्यमातून शेतात विहीर खोदण्यासाठी अनुदान दिल्या जाते; परंतु, गत काही महिन्यांपासून हे अनुदान देण्यास पंचायत समितीच्यावतीने दिरंगाई होत आहे. ते तात्काळ देण्यात यावे. तसेच घरकूल व शौचालय योजनेच्या लाभार्थ्यांना वेळीच शासकीय अनुदान देण्यात यावे. सन २०११ पासून अद्याप पंचायत समिती आर्वीने दिव्यांग बांधवांसाठी असलेला निधी खर्च केला नाही. तो तात्काळ करण्यात यावा. तालुक्यातील दिव्यांग बांधवांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ द्यावा, अशी मागणी निवेदन देतेवेळी पं.स. उपसभापती यांच्याशी झालेल्या चर्चेत आंदोलनकर्त्यांनी लावून धरली होती. पं.स. उपसभापतींनीही आंदोलनकर्त्यांच्या आंदोलनाची दखल घेत तातडीने जिल्हा परिषदेतील पंचायत विभागातील उपमुख्य कार्यकारी अधिकारी जाधव यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून त्यांचा आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांची माहिती दिली. यावेळी झालेल्या चर्चेअंती आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले. आंदोलनात राजेश सावरकर, शैलेश सहारे, बिट्टू रावेकर, नसीम सौदागर, अजय भोयर, घनश्याम क्षीरसागर, भगवान टेकाम, सय्यद आरिफ, देविदास कळपांडे, संतोष लाडे यांच्यासह शेतकरी, दिव्यांग बांधव व प्रहारचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Web Title: Prahar Attack on the P.S. office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.