अन् विमान प्रवासाने भारावला प्रणव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 11:33 PM2018-07-01T23:33:52+5:302018-07-01T23:34:56+5:30
पहिलाच विमान प्रवास असल्यामुळे अन्य विद्यार्थ्यां सारखी विमानात बसण्याची माझीही उत्सुकता वाढली होती. आम्ही नागपूर विमानतळावर पोहोचलो. अवघ्या दीड तासात दिल्लीला पोहचलो. विमानतळ पाहुन व इतक्या कमी वयात विमानाच्या प्रवासाने आपण अक्षरश: भारावलो आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : पहिलाच विमान प्रवास असल्यामुळे अन्य विद्यार्थ्यां सारखी विमानात बसण्याची माझीही उत्सुकता वाढली होती. आम्ही नागपूर विमानतळावर पोहोचलो. अवघ्या दीड तासात दिल्लीला पोहचलो. विमानतळ पाहुन व इतक्या कमी वयात विमानाच्या प्रवासाने आपण अक्षरश: भारावलो आहे. हे सर्व लोकमतमुळे शक्य झाल्याचे प्रणव काळे याने सांगितले.
प्रणव काळे या विद्यार्थ्यांची लोकमत समुहातर्फे संस्काराचे मोती स्पर्धेतील विजेत्या स्पर्धक म्हणून निवड झाली आहे. विद्यार्थ्यांना नागपूर-दिल्ली-नागपूर अशी हवाई सफर करविण्यात आली. यात सहभागी होऊन परतल्यानंतर प्रणव काळे या विद्यार्थ्यांने प्रवासाचे वर्णन कथन केले. मंगळवारला परत आल्यानंतर गुरुवारला सकाळी आर्वी येथील विद्या निकेतन शाळेचा प्रणव काळे यांचा लोकमत कार्यालयातर्फे आर्वी प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरे यांनी पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. यावेळी प्रणव काळे यांची आई वर्षा विठ्ठराव काळे, विद्या निकेतन शाळेच्या मुख्याध्यापिका निलीमा वडणारे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. आर्थिक स्थिती सर्वसाधारण असलेला हा परिवार लोकमतच्या या उपक्रमामुळे सध्या आनंदमय् वातावरणात असल्याचे प्रणवच्या आजी-आजोबांनी केला. लोकमत अश्याच उपक्रमामुळे लोकप्रिय असून महाराष्ट्रातील नंबर १ चे वृत्तपत्र असल्याचे प्रणवच्या आई-वडिलांनी यावेळी सांगितले. अनेकांचे आयुष्य संपते; पण त्यांना विमानातून प्रवास करायला मिळत नाही. प्रणवला मात्र लोकमतच्या संस्काराचे मोती या स्पर्धेमुळे नागपूर-दिल्ली-नागपूर हवाई सफर करायला मिळाला. यामुळे आम्ही धन्य झालो. लोकमतचे कितीही कौतुक करावे. गरीब परिवारातील मुलांना लोकमतच्या अशा नाविण्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून हवाई प्रवासा तसेच उपराष्ट्रपतींसह अन्य मान्यवरांची भेट घेता आली. हे आयुष्यातील कधी न विसरणारे क्षण असल्याचे प्रणव व त्याच्या कुटुंबियांनी सांगितले.