वर्ध्याच्या तहसीलदारपदी प्रीती डुडुलकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 12:34 AM2019-03-09T00:34:45+5:302019-03-09T00:35:45+5:30
येथील तहसीलदारपदी प्रीती डुडुलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या पदोन्नतीचा आदेश गुुरुवारी रात्री निघाला असून आज जागतिक महिला दिनी त्यांनी तहसीलदार पदाची सुत्रे स्विकारली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : येथील तहसीलदारपदी प्रीती डुडुलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या पदोन्नतीचा आदेश गुुरुवारी रात्री निघाला असून आज जागतिक महिला दिनी त्यांनी तहसीलदार पदाची सुत्रे स्विकारली.
प्रीती डुडुलकर यांची नायब तहसीलदार म्हणून पहिली नियुक्ती वर्धा तहसीलमध्येच झाली होती. त्यांनी सन २०१२ ते १६ मध्ये वर्धा तहसीलमध्ये नायब तहसीलदार म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यानंतर त्यांची नागपूर जिल्ह्यातील हिंगणा येथे बदली झाली. सन २०१६ ते १८ पर्यंत येथे कार्यरत राहिल्यानंतर त्यांना जानेवारी महिन्यात वर्ध्यातील जिल्हाधिकारी कार्यालाच्या अधीक्षक म्हणून पदोन्नती मिळाली. येथे कार्यरत असताना वर्ध्याचे तत्कालीन तहसीलदार मनोहर चव्हाण यांची नागभिड येथे बदली झाली.
चव्हाण यांच्या बदलीनंतर बल्लारशाह येथील विकास अहीर यांची तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली. परंतू शासनाने जागतिक महिला दिनाच्या पूर्व संध्येला काढलेल्या आदेशानुसार वर्ध्याच्या तहसीलदारपदी प्रीती डुडुलकर तर त्यांच्या जागेवर अधीक्षक म्हणून विकास अहीर यांची नियुक्ती केली. जागतिक महिला दिनी डुडुलकर यांनी कार्यभार स्वीकारुन आपल्या कामाला सुरुवात केली. डुडुलकर यांनी यापूर्वी तीन वर्ष वर्धा तहसीलमध्ये कर्तव्य बजावले असून येथील कामाची पद्धत आणि अनेकांच्या नाड्याही त्यांना माहिती आहे.