नोकरीसाठी तंत्रनिकेतनलाच पसंती; इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॅानिक्ससाठी उड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2022 11:14 PM2022-10-07T23:14:48+5:302022-10-07T23:16:55+5:30

शासकीय तंत्रनिकेतनमध्ये ३४० जागा आहेत तर उर्वरित सात खासगी तंत्रनिकेतनमध्ये १ हजार ४६२ जागा  आहेत. एकूण १ हजार ८०८ जागेसाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रियेची  सुरुवात केली होती. दुसरी, तिसरी फेरी होऊन त्यानंतर २६ सप्टेंबरला स्पॉट ॲडमिशनची फेरी घेण्यात आली. त्यानंतर ही पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना २९ सप्टेंबरला अतिरिक्त अंतिम संधी देऊन प्रवेश निश्चित करण्यात आले. 

Preference for job in Tanneriketan; Jump for Electrical, Electronics | नोकरीसाठी तंत्रनिकेतनलाच पसंती; इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॅानिक्ससाठी उड्या

नोकरीसाठी तंत्रनिकेतनलाच पसंती; इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॅानिक्ससाठी उड्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
आर्वी : दहावीच्या निकालानंतर तंत्रनिकेतनच्या प्रवेश प्रक्रियेला विलंबाने सुरुवात झाली होती. आता  उच्च व तंत्र शिक्षण संचालनाच्यावतीने पॉलिटेक्निकची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. वर्धा जिल्ह्यातील शासकीय तंत्रनिकेतन आर्वी  येथील ९५ टक्के प्रवेश निश्चित झाले. त्यानंतर १२ सप्टेंबरपासून शासकीय तंत्रनिकेतन वर्गाला  सुरुवात झाली आहे. वर्धा जिल्ह्यात एक शासकीय, एक खासगी अनुदानित व सहा खासगी असे एकूण आठ तंत्रनिकेतन महाविद्यालय आहे.
शासकीय तंत्रनिकेतनमध्ये ३४० जागा आहेत तर उर्वरित सात खासगी तंत्रनिकेतनमध्ये १ हजार ४६२ जागा  आहेत. एकूण १ हजार ८०८ जागेसाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रियेची  सुरुवात केली होती. दुसरी, तिसरी फेरी होऊन त्यानंतर २६ सप्टेंबरला स्पॉट ॲडमिशनची फेरी घेण्यात आली. त्यानंतर ही पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना २९ सप्टेंबरला अतिरिक्त अंतिम संधी देऊन प्रवेश निश्चित करण्यात आले. 
आता उच्च व तंत्र शिक्षण संचालनाच्यावतीने पॉलिटेक्निकची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. वर्धा जिल्ह्यात एकमेव असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन येथे कॉम्प्युटर इंजिनियरिंग, इलेक्ट्रिक इंजिनियरिंग, इलेक्ट्रिक ॲण्ड कम्युनिकेशन इंजिनियरिंगच्या शंभर टक्के जागा भरण्यात आल्या. 
तर सिव्हिल इंजिनियरिंग, केमिकल इंजिनियरिंगच्या ९० टक्के, मेकॅनिकल इंजिनियरला ८८ टक्के प्रवेश झाले आहे. या तुलनेत वर्धा जिल्ह्यातील उर्वरित सहा तंत्रनिकेतनमध्ये अद्यापही ५० टक्केपेक्षा अधिक जागा रिक्त आहे. त्यामुळे शासकीय महाविद्यालय हेच विद्यार्थ्यांची पसंती असल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात शासकीय तंत्रनिकेतनमध्ये सर्व विभागात ३४० जागा
महाराष्ट्र शासनाच्या तंत्रनिकेतन संचालनाद्वारे वर्धा जिल्ह्यात आर्वी येथे एकमेव शासकीय तंत्रनिकेतन आहे. यामध्ये सहा विभाग मिळून ३४० जागा आहे.

खासगी तंत्रनिकेतनच्या १ हजार ४६२ जागा
वर्धा जिल्ह्यात एक खासगी अनुदानित तर सहा खासगी अशा एकूण सात खासगी तंत्रनिकेतन आहेत. या सात खासगी तंत्रनिकेतनमध्ये एकूण १ हजार ४६२ जागा आहेत.

शासकीयच्या १७ जागा, तर खासगीच्या ८४५ जागा रिक्त
आर्वी येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये ९५ टक्के  जागेवर विद्यार्थ्यांनी निश्चित करून प्रवेश घेतला.   कॉम्प्युटर इंजिनियरिंग १०० टक्के इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कॅम्युनिकेशन इंजिनियरिंग १०० टक्के, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग १०० टक्के प्रवेश पूर्ण झाले.  सिव्हिल इंजिनियरच्या सहा, मेकॅनिकल इंजिनियरच्या सात व केमिकल इंजिनिअरच्या चार, अशा केवळ १७ जागा रिक्त आहे.  तर  जिल्ह्यातील सात खासगी तंत्रनिकेतनमध्ये १ हजार ४६२ पैकी ६१७ जागा भरण्यात आल्या असून ८४५ म्हणजे ५० टक्केच्या वर जागा रिक्त आहे.

याकडे विद्यार्थ्यांचा ओढा
तंत्रनिकेतनचा कोणता कोर्स केल्यावर पटकन नोकरी मिळेल, अशा आशेत सर्व विद्यार्थी होते.  त्यानुसार त्यांनी चाचणी करून त्यांनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली. मोठ्या प्रमाणात कॉम्प्युटर इंजिनियरिंग, इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग व केमिकल इंजिनिअरिंग ब्रांचकडे विद्यार्थ्यांचा  जास्त ओढा दिसून आला.

यावर्षी शासकीय तंत्रनिकेतनची प्रवेशाची परिस्थिती अत्यंत चांगली असून ९५ टक्के प्रवेश पूर्ण झाले आहे. मागे दोन वर्ष कोरोनामुळे फरक पडला होता. शासकीय तंत्रनिकेतनमध्ये नोकरीची हमी, कॅम्पसमधून निवड, यामुळे मोठ्या प्रमाणात ॲडमिशन झाल्या. शासकीय तंत्रनिकेतन असल्याने फी कमी आहे. विद्यार्थ्यांना विविध मार्गदर्शन समुपदेशन आमच्या प्राध्यापकांनी केले होते. अभियांत्रिकीच्या उच्च शिक्षणासाठी सर्वदारे खुली असल्याने व  विविध कंपनीत नोकरीची हमी असल्याने सर्वच ट्रेंडला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
 - डॉ. एम. ए. अली, प्राचार्य.
 

Web Title: Preference for job in Tanneriketan; Jump for Electrical, Electronics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.