राज्यस्तरीय मुख्याध्यापक शैक्षणिक संमेलनाची तयारी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 06:00 AM2019-12-14T06:00:00+5:302019-12-14T06:00:15+5:30

शनिवारी १४ डिसेंबरला सकाळी ९ वाजता ध्वजारोहण होणार आहे. १० वाजता अधिवेशनाचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात येईल. अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार कुलपती दत्ता मेघे राहतील. यावेळी आमदार विक्रम काळे, माध्यमिक व उच्च माध्यमिक संघटनेचे संचालक दिनकर पाटील, दत्तात्रय जगताप आदी उपस्थित राहणार आहे. रविवारी १५ डिसेंबरला समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले राहतील.

The preparations for the State Level Headquarters Educational Conference are complete | राज्यस्तरीय मुख्याध्यापक शैक्षणिक संमेलनाची तयारी पूर्ण

राज्यस्तरीय मुख्याध्यापक शैक्षणिक संमेलनाची तयारी पूर्ण

googlenewsNext
ठळक मुद्देसुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटन : समारोपाला नाना पटोले यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मुख्याध्यापकांच्या राज्यस्तरीय शैक्षणिक साहित्य संमेलनात विविध शैक्षणिक साहित्य सह पुस्तकाचे नावीन्यपूर्ण स्टॉल लागलेले असून शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षणप्रेमींना ज्ञानाची पर्वणी मिळणार आहे.
दत्ता मेघे ऑडिटोरियम मेडिकल कॉलेज सावंगी येथे १४ व १५ डिसेंबरला राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलन होणार आहे महात्मा गांधी व विनोबा भावे यांची पावनभूमी असलेल्या जिल्ह्यात या संमेलनाला राज्यातील ३५ जिल्ह्यातून अडीच ते तीन हजार मुख्याध्यापकांची उपस्थिती राहणार आहे. विविध समितीने आपली कामे पूर्ण केली असून सर्व व्यवस्था चोख करण्यात आली आहे.
दोन दिवसीय संमेलनामध्ये परिसंवाद, निबंध वाचन, विविध चर्चासत्र तसेच शिक्षण क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे.
शनिवारी १४ डिसेंबरला सकाळी ९ वाजता ध्वजारोहण होणार आहे. १० वाजता अधिवेशनाचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात येईल. अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार कुलपती दत्ता मेघे राहतील. यावेळी आमदार विक्रम काळे, माध्यमिक व उच्च माध्यमिक संघटनेचे संचालक दिनकर पाटील, दत्तात्रय जगताप आदी उपस्थित राहणार आहे. रविवारी १५ डिसेंबरला समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले राहतील. या दोन दिवसीय कार्यक्रमास डॉ. शकुंतला काळे डॉ. अशोक भोसले कुलपती वेदप्रकाश मिश्रा आ. नागो गाणार आ. श्रीकांत देशपांडे आ. पंकज भोयर आ. समीर कुणावार आ. रणजित कांबळे आ. दादाराव केचे आ. अनिल सोले शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, शंकर पाटील, डॉ. अशोक भोसले, द.गो, जगताप, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओंबासे, नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष रविकांत देशपांडे, शिक्षण उपसंचालक अंबादास पेंदोर ,संमेलन अध्यक्ष दीपक दोंदल आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अतिथींचे मार्गदर्शन व अभ्यासपूर्ण भाषणे शिक्षण प्रक्रियेला नवी दिशा व चालना मिळवून देईल. नवीन शैक्षणिक धोरण, सध्याची स्थिती व शैक्षणिक समस्या, संच मान्यता व कर्मचारी स्थिती त्यावर अडचणी व उपाय, शैक्षणिक गुणवत्ता, शिक्षक पालक भूमिका आदी अनेक विषयांवर चिंतनपर शोधनिबंध या अधिवेशनात सादर केले जाणार आहेत. महात्मा गांधीजीची १५० वी जयंती, तसेच विनोबा भावे यांची ही १२५ वी जयंती या निमित्ताने गांधी जिल्ह्यातील कर्मभूमीत हे संमेलन होत आहे. या संमेलनास मुख्याध्यापक, शिक्षक, संस्थाध्यक्ष आदींनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: The preparations for the State Level Headquarters Educational Conference are complete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.