५५ कोटी ४६ लक्ष खर्चाचा अर्थसंकल्प सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 12:22 AM2019-02-28T00:22:06+5:302019-02-28T00:22:35+5:30
स्थानिक नगर पालिकेचा ५५ कोटी ४६ लक्ष खर्चाचा व वर्षाअखेर ७ कोटी ८५ लक्ष शिल्लकीचा अर्थसंकल्प सादर करून सर्वानुमते मंजूर करण्यात आला. यावेळी आयोजित विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सुचिता मडावी होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : स्थानिक नगर पालिकेचा ५५ कोटी ४६ लक्ष खर्चाचा व वर्षाअखेर ७ कोटी ८५ लक्ष शिल्लकीचा अर्थसंकल्प सादर करून सर्वानुमते मंजूर करण्यात आला. यावेळी आयोजित विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सुचिता मडावी होत्या.
स्थानिक न.प. च्या विशेष सभेत नगराध्यक्ष मडावी यांनी २०१९-२० या चालू वर्षाच्या अपेक्षीत खर्चाचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी न.प. उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र मदनकर, गटनेता शोभा तडस, न.प. सदस्य मारोती मरघाडे, नंदू वैद्य, मिलिंद ठाकरे, संगीता तराळे, कल्पना ढोक, संध्या कारोटकर, सुनिता बकाणे, सुनिता ताडाम, सारीका लाकडे, अ. नईम आदींनी चर्चेत सहभाग घेवून व काही दुरूस्त्या सूचवून सभागृहात मांडलेला अर्थसंकल्प सर्वानुमते मंजूर केला. न.प.ची विकासकामांची वाटचाल सुरू असून शहराच्या सर्वांगीण विकासासोबतच सौंदर्यीकरणाचे कामावर भर देण्यात आल्याचे यावेळी नगराध्यक्ष मडावी यांनी सांगितले.
अर्थसंकल्पातील अपेक्षीत खर्चात वैशिष्टपूर्ण कामे अंतर्गत स्टेडियमचे उर्वरीत बांधकाम २ कोटी, वैशिष्ट्यपूर्ण कामात अंतर्गत नाली व रस्ते बांधकाम ६ कोटी, विशेष अनुदानाअंतर्गत इतर विकास कामे १२ कोटी, नागरी दलीत वस्ती सुधारणा १ कोटी, रस्ते अनुदानात १ कोटी, युडी ६ अंतर्गत शॉपींग सेंटर बांधकाम ५० लक्ष, माध्यमिक शाळा विस्तारीत बांधकाम १० लक्ष, हरित पट्टे विकास ५० लक्ष, खासदार निधी ३० लक्ष, आमदार निधी ५ लक्ष, अल्पसंख्याक अनुदानाअंतर्गत कामे १५ लक्ष, अग्नि सुरक्षा योजना १० लक्ष, सांडपाण्यावर प्रक्रिया व विल्हेवाट लावणे २५ लक्ष, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलीत वस्ती सुधारणा १ कोटी, एकलव्य आदिवासी घरकुल योजना ५० लक्ष रूपयांची तरतूद करण्यात आली. रमाई घरकुल योजना ३ कोटी २५ लक्ष, पंतप्रधान आवास योजना १७ कोटी, नागरी दलित वस्ती पाणी पुरवठा व स्वच्छता विकास कामे १० लक्ष, अपंग कल्याण ५ लक्ष, न.प. प्राथमीक सोयी सुविधा अनुदान १५ लक्ष, १४ व्या वित्त आयोगातून खर्च १ कोटी, सीटी सर्व्हेक्षण २ लक्ष, नगरोत्थान अभियान अंतर्गत कामे २० लक्ष तसेच इतर विकास कामांचा समावेश करण्यात आला.