राष्ट्रपती देणार सेवाग्राम आश्रमला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 03:50 PM2019-08-08T15:50:43+5:302019-08-08T15:52:36+5:30

सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील कार्यक्रमानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद १७ ऑगस्ट शनिवारला सेवाग्राम येथे येणार आहेत.

President to visit Sevagram Ashram | राष्ट्रपती देणार सेवाग्राम आश्रमला भेट

राष्ट्रपती देणार सेवाग्राम आश्रमला भेट

Next
ठळक मुद्देकस्तुरबा रुग्णालयात कार्यक्रमआतापर्यंत पाच राष्ट्रपतींनी घालविला वेळ

दिलीप चव्हाण।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील कार्यक्रमानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद १७ ऑगस्ट शनिवारला सेवाग्राम येथे येणार आहेत. या दरम्यान ते जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या आश्रमालाही भेट देणार आहेत. सेवाग्राम आश्रमाला भेट देणारे हे सहावे राष्ट्रपती आहेत. त्यांच्या आगमनाकरिता प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील गरजू व सर्वसामान्यांना आरोग्य सेवा पुरविण्याकरिता सेवाग्राम येथे कस्तुरबा रुग्णालयाची, पर्यायाने वैद्यकीय महाविद्यालयाचीही स्थापना करण्यात आली. याचा विस्तार वाढत असून येथे आयोजित कार्यक्रमानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद १७ ऑगस्टला सेवाग्रामला येत आहेत. तत्पूर्वी ते महात्मा गांधी यांच्या आश्रमाला भेट देणार आहेत.
स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य चळवळीचे केंद्रबिंदू असलेल्या या आश्रमात आजपर्यंत अनेकांनी भेटी दिल्या. या ऐतिहासिक स्थळावरून स्वातंत्र्य चळवळीची रणनिती आखल्या गेली. तत्कालीन नेत्यांच्या बैठकी व चर्चाही याच परिसरात झाल्याने येथून अनेकांना प्रेरणा आणि ऊर्जा मिळते. आजही देशातील राष्ट्रीय नेते व लोकप्रतिनिधी व पर्यटक या ठिकाणी येऊन बापूंचे विचार जाणून घेतात. त्यामुळे हा आश्रम नेहमीच विचार आणि ऊर्जेचे स्त्रोत राहिला आहे.

बकुळ वृक्ष झाला डौलदार
या आश्रमात येणाºया मान्यवरांचे आश्रम प्रतिष्ठानच्या हस्ते आश्रम परंपरेनुसार सूतमाळा, बापूंची पुस्तके देऊन स्वागत केले जातात. त्यानंतर बापू कुटीत प्रार्थणा केल्यानंतर आश्रमाच्या इतरही कुटींची व आश्रमातील कामकाजाची माहिती दिली जाते. सोबतच मान्यवरांच्या हस्ते आश्रम परिसरात वृक्षारोपणही केले जाते. त्यामुळे आश्रम परिसर हिरव्यागार वृक्षांच्या छायेत गुडूप झाला आहे. या परिसरात तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी २६ नोव्हेंबर २०१४ रोजी बकुळचे रोपटे लावले होते. आता त्या रोपट्याचा डौलदार वृक्ष झाला असून येथील हिरवळीत भर घालत आहे.

Web Title: President to visit Sevagram Ashram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.