कृपलानीच्या अतिक्रमणाबाबत केसरीमलवर दबाव वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 09:36 PM2018-12-08T21:36:27+5:302018-12-08T21:37:20+5:30
वर्धा-नागपूर मार्गावर शिवाजी चौक ते इंदिरा गांधी चौक दरम्यान केसरीमल कन्या शाळेसमोर कृपलानी बंधूंचे बेकायदेशीर हॉटेल बांधकाम सुरू आहे. या हॉटेलच्या बांधकामामुळे केसरीमल कन्या शाळेतील १२५० विद्यार्थिनीच्या भवितव्याला धोका निर्माण झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वर्धा-नागपूर मार्गावर शिवाजी चौक ते इंदिरा गांधी चौक दरम्यान केसरीमल कन्या शाळेसमोर कृपलानी बंधूंचे बेकायदेशीर हॉटेल बांधकाम सुरू आहे. या हॉटेलच्या बांधकामामुळे केसरीमल कन्या शाळेतील १२५० विद्यार्थिनीच्या भवितव्याला धोका निर्माण झाला आहे.
केसरीमल कन्या शाळेच्या व्यवस्थापनाने या विरोधात तत्काळ नगर पालिकेकडे सदर अतिक्रमण पाडण्याबाबत तक्रार नोंदवावी अशी मागणी शिवा संघटनेसह विविध सामाजिक संघटनांनी केली आहे. केसरीमल कन्या शाळा सोमवारी या प्रकरणी नगर पालिकेकडे तक्रार दाखल करणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे. केसरीमल कन्या शाळेत १ हजार २५० मुले, मुली शिक्षण घेत आहेत. सदर शाळेचे तीनही प्रवेशद्वार हे समोरील अति रहदारीच्या वर्धा नागपूर महामार्गावर आहेत. याच महामार्गाला लागून कृपलानी बंधुचे बेकायदेशीर व अनधिकृत हॉटेल बांधकाम सुरू आहे. या मार्गावर शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी, विद्यार्थिनीची ने आण करणारे आॅटो, स्कूल बसेस यांची मोठी वर्दळ दिवसभर राहते. अशा ठिकाणी हॉटेलचे बांधकाम करण्यात येत आहे. याठिकाणी पार्कींगची व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे सरकारी जागेवरच वाहने उभी केली जाणार आहे. त्यामुळे या ठिकाणी अपघाताची शक्यता बळावली असून सार्वजनिक हित लक्षात घेवून या हॉटेलचे बांधकाम त्वरीत पाडण्यात यावे अशी मागणी शिवा संघटनेचे वर्धा जिल्हा प्रमुख सुरेश पट्टेवार यांनी केली आहे. आता केसरीमल कन्या शाळा व्यवस्थापन समिती व येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या पालकांनी केसरीमल कन्या शाळेवर दबाव वाढविला असून शाळा व्यवस्थापनाने तत्काळ अवैध बांधकामाविरोधात तक्रार नगर पालिकेकडे नोंदवावी व हे बांधकाम थांबवावे अशी मागणी करण्यात आली आहे. सुरेश पट्टेवार यांनी ७ डिसेंबरला केसरीमल कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका व शाळा व्यवस्थापन समितीचे सचिव यांना या संदर्भात निवेदन दिले आहे. यात हे अतिक्रमण पाडण्यासाठी तक्रार न केल्यास पुढे होणाºया अपघातांना शाळा व्यवस्थापन जबाबदार राहिल. असे या निवेदनात नमूद केले आहे.
अॅड. गुरू यांनी बजावली महावितरणला नोटीस
आम रहदारीच्या मुख्य मार्गावर महावितरण कंपनीने बेकायदेशीर बांधकाम होत असलेल्या कृपलानी बंधूंच्या हॉटेलला वीज पुरवठा करण्यासाठी मोठे विद्युत रोहित्र दिले आहे. हे विद्युत रोहित्र सरकारी जागेवर उभे करण्यात आले आहे. तसेच जमिनीतून वायर टाकून हा पुरवठा करण्यात आला आहे. उद्या अपघात झाल्यास. या परिसरातील शेकडो घरांना नुकसान होणार आहे. त्यामुळे येथील विद्युत पुरवठा तत्काळ बंद करावा अशी मागणी अॅड. रवींद्र गुरू यांनी लेखी नोटीसद्वारे केली आहे. महावितरणने बेकायदेशीररित्या दिलेल्या या विद्युत पुरवठ्यामुळेही महावितरणसह कृपलानी बंधुची अडचण वाढणार आहे.